या कारणामुळे शाहरुख खान अक्षय सोबत काम करत नाही

शाहरुख खान आणि अक्षय कुमार जवळजवळ मागील ३० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. तरीही ‘दिल तो पागल है’ चित्रपट सोडला तर दोघांनी एकत्र कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. ‘दिल तो पागल है’ चित्रपटात अक्षय कुमारने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. तर शाहरुख खान अक्षय कुमारच्या हे बेबी चित्रपटात ‘दिल का मामला है दिलबर’ ह्या गाण्यात दिसून आला होता. ह्या व्यतिरिक्त दोघांनी आजपर्यंत कोणत्याही चित्रपटांत एकत्र काम केलेले नाही, त्यामुळे ह्या दोघांबाबत खूप प्रकारच्या चर्चा सुद्धा चालू असतात कि ह्या दोन सुपरस्टार्स मध्ये काही मतभेद वैगेरे आहेत म्हणून एकाच चित्रपटात काम करत नाहीत वैगेरे वैगेरे. जिथे शाहरुख खान वर्षाला एखादा चित्रपट करतो तर दुसरीकडे अक्षय कुमार वर्षभरात तीन ते चार चित्रपट करून मोकळा झालेला असतो. आताच काही दिवसाअगोदर एका मुलाखतीत शाहरुख खानला एक प्रश्न विचारला गेला कि, ‘काय तू वर्षभरात तीन किंवा तीनपेक्षा जास्त चित्रपटांत काम करू शकतोस का? किंवा तू अक्षय कुमारसोबत काम करू शकतोस का?’

शाहरुख खानने ह्या प्रश्नाचे मजेशीर आणि लॉजिकल प्रकारे उत्तर दिले. शाहरुखने सांगितले, “मी ह्या गोष्टीवर काय बोलू, जेव्हा अक्षय कुमार झोपेतून उठतो तेव्हा मी झोपायला जातो. अक्षयचा दिवस लवकर सुरु होतो. जोपर्यंत मी सेटवर पोहोचेल, तोपर्यंत अक्षयचे काम तर संपलेले असेल. तेव्हा तो घरी निघायची तयारी करत असेल ज्यामुळे तो पुढच्या दिवशी येऊन अजून काम करू शकेल. दुसरीकडे मी रात्री काम करणारा माणूस आहे. प्रत्येकालाच माझ्यासारखे रात्री शूटिंग करायला आवडेलच असे नाही. खरंतर अक्षय सोबत काम करणे खूप गमतीशीर असेल. कारण दोघेही सेटवर भेटणारच नाहीत. जेव्हा तो जात असेल, तेव्हा मी येत असेल. मला अक्षयसोबत काम करायचे आहे, परंतु आमचा टायमिंग कधीच मॅच होणार नाही.”हे पहिल्यांदा नाही आहे जेव्हा कोणत्या अभिनेत्याने अक्षय कुमारसोबत काम करण्याबद्दल अश्या प्रकारचे उत्तर दिले आहे. ह्याअगोदर सलमान खानने सुद्धा अक्षय कुमारबद्दल ह्या गोष्टी म्हटल्या आहेत. सलमान खान आणि अक्षय कुमार ह्या दोघांनी एकत्र ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘जानेमन’ ह्यासारख्या चित्रपटात काम केले होते. सलमानने अक्षय कुमारबद्दल हे सुद्धा सांगितले होते कि, जोपर्यंत तो ‘मुझसे शादी करोगी’ च्या सेटवर पोहोचायचा तोपर्यंत अक्षय आपली शूटिंग पूर्ण करून घरी जायच्या तयारीत असायचा. त्या चित्रपटात अनेक दृश्यांत त्या दोघांना एकत्र दिसायचे होते ते दोन्ही कलाकारांनी वेगवेगळी शूटिंग केली होती. ज्या फ्रेम मध्ये दोघांना एकच फ्रेम मध्ये दिसायचे होते फक्त तेच सिन त्यांनी एकत्र केले होते.’ तसेही अक्षयच्या ह्या वेळापत्रकाबद्दल संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे की तो वेळेला खूप महत्व देतो आणि वेळेची शिस्त व उत्तम प्रकृती असलेले आयुष्य जगतो. तो पार्टी करत नाही, धूम्रपान करत नाही आणि मध्यपान सुद्धा करत नाही. अक्षय कुमारची जिथे वर्षांला ४ ते ५ चित्रपट रिलीज होतात, तिथे शाहरुख आणि सलमान आपला एक चित्रपट पूर्ण करतात. आणि आमिर खानचा चित्रपट करण्याची प्रक्रिया तर खूपच वेगळी आहे. त्यामुळे तो तर आपले काम करण्यासाठी वेळ घेतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *