आर्ची पहा आता किती सुंदर दिसू लागली आहे

सैराट चित्रपट येऊन आता जवळ जवळ साडेतीन वर्षे झाली परंतु ह्या चित्रपटातील भूमिका आणि कलाकार ह्यांच्या भोवतीचे वलय आजही कमी झालेले नाही. इतकेच काय ह्या चित्रपटाची क्रेज अजूनही कायम आहे. अनेकजण हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतात, युट्युबवर सैराटची गाणी पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ‘सैराट’ हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ ला रिलीज झाला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात गाजला. मराठी चित्रपटसृष्टीत १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा एकमेव मराठी चित्रपट होता. जसा हा चित्रपट लोकप्रिय झाला, त्याचप्रमाणे ह्या चित्रपटातले कलाकारही खूप लोकप्रिय झाले.

सैराट चित्रपटात प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख बजावली होती. प्रत्येकाने तोडीस तोड अभिनय केला होता. परंतु ह्या चित्रपटात सर्वात जास्त भाव खाऊन गेले ते कलाकार म्हणजे आर्ची आणि परश्या. आर्ची आणि परश्याच्या जोडीला तर लोकांनी डोक्यावरच घेतले होते. ह्या चित्रपटातली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू. सैराट चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तिला अजून प्रसिद्धी मिळाली. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत जात आहे. एका रात्रीत स्टार होणे काय असते हे रिंकूला विचारा, तिच्या नावाची क्रेज अजूनही कमी झालेली नाहीए. रिंकू नियमित सोशिअल मीडियावर फोटोज अपलोड करत असते. तिचा आताचे फोटोज पाहून सैराट मधली आर्ची नक्की हीच का, असा अनेकांच्या मनात विचार येत असेल. काही दिवसांपूर्वीच ती आणि जान्हवी कपूर ह्यांची भेट झाली होती. ह्या भेटीचा फोटो दोघींनी इंस्टाग्राम वर शेअर केला. बघता बघता हा फोटो संपूर्ण सोशिअल मीडियावर वायरल झाला.रिंकूचा जन्म ३ जून २००१ मध्ये अकलूज येथे झाला. सैराट चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती सातवीत शिकत होती. आणि जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा ती नववीत होती. रिंकूची आई हि नागराज मंजुळे ह्यांची मैत्रीण आहे. रिंकूची आई एकदा रिंकूसोबत नागराज मंजुळेंना भेटायला गेली असताना नागराज मंजुळेंनी रिंकूला चित्रपटाची ऑफर दिली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत रिंकूच्या लूक मध्ये खूपच बदल झाला आहे. रिंकूने आपल्या लूकसाठी खूप मेहनत घेतली आहे. ती आता खूपच स्लिम झालेली पाहायला मिळत आहे. सैराट शिवाय रिंकूने ‘कागर’ चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. परंतु चित्रपटात रिंकूच्या अभिनयाचे कौतुक झाले. ह्या चित्रपटात तिने राजकीय नेत्याची भूमिका साकारली होती. तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’ येत्या काही दिवसांतच रिलीज होईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *