NMJOKE

अलका कुबल नाही तर बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ‘माहेरची साडी’ चित्रपटात घेणार होते

१९९१ मध्ये आलेल्या ‘माहेरची साडी’ ह्या चित्रपटाला आता जवळजवळ २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने ह्या चित्रपटाचा सातत्याने उल्लेख होत असतो. ‘माहेरची साडी’ चित्रपट म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर सर्वात प्रथम चेहरा येतो तो म्हणजे अलका कुबल ह्यांचा. त्यांनी चित्रपटात केलेल्या अप्रतिम अभिनयामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता. परंतु तुम्हांला माहिती आहे का, ह्या चित्रपटात अभिनेत्रीसाठी पहिली पसंती ह्या अलका कुबल नव्हत्या. त्यांच्या जागी अगोदर बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीचा विचार करण्यात आला होता. दिग्दर्शक अभय कोंडके ह्यांना माहेरच्या साडी साठी असा लोकप्रिय चेहरा पाहिजे होता ज्यामुळे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या प्रचंड हिट ठरेल. त्यामुळे त्यांनी अभिनेत्रीसाठी बॉलिवूडचा मराठमोळा चेहरा चित्रपटात घेण्याचे ठरवले होते. आता बॉलिवूडची ती अभिनेत्री कोण होती, का अभय कोंडकेंनी नंतर आपला विचार बदलला, त्यानंतर कसे काय त्यांनी अलका कुबल ह्यांना ह्या चित्रपटासाठी निवड केली ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

‘मैने प्यार किया’ हा चित्रपट तर सर्वांनाच लक्षातच असेल. १९८९ साली आलेला हा चित्रपट त्याकाळी खूपच लोकप्रिय झाला होता. सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन हि जोडी ह्या चित्रपटात होती. भाग्यश्रीने ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. आपल्या पहिलाच चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे मराठमोळी भाग्यश्री ह्या चित्रपटामुळे खूपच लोकप्रिय झाली होती. तिला बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. बॉलिवूडसह अनेक चित्रपटांसाठी तिला विचारण्यात येऊ लागले होते. त्याच दरम्यान निर्माते अभय कोंडके हे आपल्या आगामी ‘माहेरची साडी’ ह्या चित्रपटासाठी अभेनेत्रीच्या शोधात होते. त्यांना भाग्यश्रीमध्ये ‘माहेरची साडी’ चित्रपटातली अभिनेत्री दिसली होती. त्यामुळे ह्या चित्रपटात तिलाच घ्यायचे असा निश्चयच त्यांनी केला होता. त्यांना विश्वास होता कि मराठी चित्रपटात बॉलिवूडचा लोकप्रिय चेहरा असेल तर चित्रपट चांगलाच व्यवसाय करेल आणि चित्रपटाला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळेल. त्यामुळे ‘माहेरची साडी’ चित्रपटातली प्रमुख भूमिकेसाठी भाग्यश्रीला विचारण्यात आले. त्यांनी अनेकदा तिच्या भेटीगाठी घेतल्या. परंतु भाग्यश्रीने कधीच चित्रपटासाठी होकार दिला नाही. त्यांनी जवळ जवळ दीड वर्षे तिच्या उत्तराची प्रतीक्षा केली. परंतु तिचा कुठलाही प्रतिसाद भेटत नाही हे पाहून मग विजय कोंडकेंनी आपला विचार बदलला.अभय कोंडकेंनी चित्रपटासाठी भाग्यश्रीचा विचार करणे सोडून चित्रपटात वेगळी अभिनेत्री घेण्याची ठरवले. जवळजवळ दीड वर्षे अभिनेत्रीची वाट पाहून भाग्यश्रीचा होकार मिळवण्यात जास्त वेळ वाया गेल्यानंतर त्यांनी ठरवले कि मराठी चित्रपटातल्या अभिनेत्रीलाच घेऊन चित्रपट करूया. त्यांनी मग अलका कुबल ह्यांना अभेनेत्रीची ऑफर दिली. ‘लेक चालली सासरला’ ह्या चित्रपटात अलका कुबल ह्यांनी अभिनेत्रीची भूमिका खूप चांगल्याप्रकारे निभावली होती, त्यामुळे ‘माहेरची साडी’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी अलका कुबल योग्य अभिनेत्री आहेत असे वाटल्यामुळे अभय कोंडकेंनी अलका कुबल ह्यांना ह्या चित्रपटात घ्यायचे ठरवले होते. अलका कुबल ह्यांना चित्रपटाची कथा खुप आवडली होती त्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी लगेच होकार दिला. अलका कुबल ह्यांनी मिळालेल्या ह्या संधीचे सोनं केले आणि ‘माहेरची साडी’ हा चित्रपट जबरदस्त सुपरहिट ठरला. अलका कुबल ह्यांनी केलेल्या अभिनयामुळे चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आणि ह्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. अलका कुबल ह्यांना ह्याच चित्रपटामुळे ‘सोशिक नायिका’ म्हणून एक वेगळी इमेज दिली. त्याव्यतिरिक्त त्याकाळी मराठीतील सर्वत आघाडीची नायिका म्हणून पुढे आली.
Exit mobile version