NMJOKE

अक्षय कुमार म्हणाला म्हणून ‘हेराफेरी’ मध्ये संजय दत्त ऐवजी सुनील शेट्टी ला घेतले

अक्षय कुमार बॉलिवूडचा असा हिरो आहे ज्याने सर्व प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे भले मग ते ऍक्शन असो, रोमान्स असो, कॉमेडी असो, देशभक्तीवर असो किंवा मग सामाजिक संदेश देणारा चित्रपट असो. त्याने प्रत्येकवेळी स्वतःच्या चित्रपटाचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ह्यांची केमिस्ट्री तर सर्वांना माहितीच आहे. ह्या दोघांनी मिळून बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहेत. ह्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी चांगली आहे, त्यापेक्षा जास्त त्यांची खऱ्या आयुष्यात खूप चांगली मैत्री आहे. आज आपण त्यांच्या मैत्रीबद्दल एक किस्सा जाणून घेणार आहोत. ज्यावेळी अक्षय कुमार ऍक्शन भूमिकेतून कॉमेडी भूमिकेत आला होता तेव्हा त्याने एक चित्रपट केला होता, तो चित्रपट आजच्या घडीला बॉलिवूडच्या एव्हरग्रीन कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट आहे ‘हेरा फेरी’. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल कि ह्या चित्रपटात सुनील शेट्टीला भूमिका फक्त आणि फक्त अक्षय कुमारच्या सांगण्यावरून मिळाली. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि केव्हा अक्षय कुमारने सुनील शेट्टीला हा चित्रपट मिळवून दिला, का त्याने हा चित्रपट सुनील शेट्टीलाच दिला आणि कशी आपली मैत्री निभावली.

अक्षय कुमार जेव्हा बॉलिवूड चित्रपटात आला होता तेव्हा त्याने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात ऍक्शन चित्रपटांपासून केली होती. आपल्या सुरुवातीच्या काळात ऍक्शन चित्रपटात त्याने बहुतेक करून मल्टीस्टारर चित्रपट, ज्यात त्याच्या व्यतिरिक्त अजून अभिनेते आहेत असे चित्रपटच केले. ह्या मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये अक्षय कुमारला जर सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्यासोबत पसंत केले गेले असेल तर तो म्हणजे सुनील शेट्टी. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे दोघेही त्याकाळी असे अभिनेते होते कि ज्यांच्या ऍक्शनवर प्रेक्षक खूप टाळ्या वाजवायचे. त्याकाळी अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची जोडी ‘मोहरा’, ‘सपूत’, ‘वक्त हमारा है’ ह्या चित्रपटांत लोकांना खूपच आवडली. परंतु एक वेळ अशी आली होती जेव्हा अक्षय कुमारला ऍक्शन चित्रपटांव्यतिरिक्त वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या. त्याला आपली ऍक्शन हिरो वाली इमेज बदलायची होती. हेच कारण होते कि अक्षय हळूहळू ऍक्शन चित्रपटांपासून कॉमेडी प्रकारच्या चित्रपटांकडे वळायला लागला होता. तेव्हा त्याला २००० साली ‘हेरा फेरी’ चित्रपट ऑफर झाला.ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत होते आणि चित्रपटाची सुरुवातीची स्टारकास्ट होती संजय दत्त, करिश्मा कपूर आणि अक्षय कुमार. संजय दत्तने त्यावेळी ‘कारटूस’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती आणि हेराफेरी चित्रपटासाठी तो तारखा देऊ शकत नव्हता. कारण त्यावेळी त्याची कोर्टात केस चालू होती. हेच कारण होते कि त्याचे सारखं सारखं कोर्टात येणं जाणं चालू होते. चित्रपटासाठी त्याला आपल्या तारखा देता येत नव्हत्या. आणि जरी हे शक्य होत असते तरी संजय दत्तने सांगितले होते कि तो फक्त आणि फक्त रात्रीचेच शूटिंग करू शकतो. जेव्हा हि गोष्ट त्याने निर्माता फिरोझ नाडियादवाला ह्यांना सांगितली तेव्हा त्यांना चित्रपटासाठी फक्त रात्रीचे शूटिंग करणे पटलं नाही. शेवटी संजय दत्तने हा चित्रपट सोडला. संजय दत्तने चित्रपट सोडल्यानंतर फिरोज नाडियादवाला आणि प्रियदर्शन ह्या दोघांच्या डोक्यात फक्त एकच नाव आले ते म्हणजे अजय देवगण. त्यांनी अजय देवगणला ह्या चित्रपटासाठी विचारणा केली. परंतु अजय देवगण चित्रपटासाठी तारखा देऊ शकत नव्हता त्यामुळे त्यानेही चित्रपटात काम करण्यास नकार दिला. चित्रपटाची कथा पूर्ण झालेली होती, चित्रपटाची घोषणा झालेली होती परंतु संजय दत्तने चित्रपट सोडला होता. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शकांना त्याच्या जागी दुसरा नवीन अभिनेता मिळत नव्हता.हीच समस्या जेव्हा अक्षय कुमारला माहिती पडली तेव्हा त्याने दिग्दर्शक आणि प्रोड्युसर दोघांनाही आपला मित्र सुनील शेट्टीला चित्रपटात घेण्यासाठी सांगितले. सुनील शेट्टीचे नाव ऐकताच दोघेही विचारात पडले होते कारण ते एक कॉमेडी चित्रपट बनवत होते आणि त्यात जे अभिनेते होते ते ऍक्शन हिरो होते. परंतु नंतर अक्षय कुमारने दोघांनाही विश्वास दिला कि ज्याप्रकारे तुम्हांला माझ्यावर विश्वास आहे त्याचप्रकारे मला सुनील शेट्टीवर विश्वास आहे कि तो ह्या भूमिकेला खूप चांगल्या प्रकारे निभावेल. अक्षय कुमारचे हे बोलणे ऐकून शेवटी सुनील शेट्टीला ह्या चित्रपटात घेतले गेले. चित्रपट बनून पूर्ण झाला, चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट तुफान गाजला. आजच्या घडीला ‘हेराफेरी’ चित्रपट सर्वात जास्त लोकप्रिय हिंदी कॉमेडी चित्रपट म्हणून ओळखला जातो. ह्या चित्रपटाचा सिक्वेल सुद्धा बनला ‘फिर हेराफेरी’, आणि आता ‘हेराफेरी ३’ वर सुद्धा चर्चा चालू आहे. ह्या चित्रपटानंतर सुनील शेट्टी कॉमेडी चित्रपटांत दिसू लागला. त्याने अक्षय कुमार सोबत ‘फिर हेराफेरी’, ‘आवारा पागल दिवाने’, ‘दे दणादण’ सारखे चित्रपट केले. सुनील शेट्टीचे हे वैशिष्ट्य तेव्हा फिरोज नाडियादवाला ह्यांना दिसले नव्हते, ते अक्षय कुमारने तेव्हाच पाहिले होते. आजच्या घडीला सुनील शेट्टीचा अभिनय सर्वांनाच माहिती आहे. तो एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो.
Exit mobile version