रसना गर्ल ची हि आहे दुःखद कहाणी, वाढदिवसादिवशीच काय झाले पहा

तुम्हांला ‘रसना’ची ती टीव्हीवर येणारी जाहिरात तर लक्षात असेलच, त्यात एक क्युट लहान मुलगी होती जिने ‘आय लव्ह यु रसना’ म्हणत सर्वांचे मन जिंकले होते. आज आपण त्याच मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. त्या लहान मुलीचे नाव तरुणी सचदेव आहे. तरुणी एक भारतीय मॉडेल आणि बालकलाकार होती. तिचा जन्म १४ मे १९९८ मध्ये मुंबईमध्ये झाला. तिचे वडील हरेश सचदेव एक उद्योगपती आहेत. तिच्या आईचे नाव नीता सचदेव आहे. तरुणी आपले शिक्षण मुंबईत घेत होती. तिची आई राधा गोपीनाथ मंदिराच्या भक्त मंडळाची सदस्य होती. त्यामुळे तरुणीने मंदिराच्या उत्सवाच्या अनेक नाटकांमध्ये भाग घेतला. ती वयाच्या पाचव्या वर्षीच इंडस्टीमध्ये आली. ती तिच्या काळातली सर्वात जास्त पैसे कमावणारी बालकलाकारसुद्धा बनली.

तरुणीने रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाईल, एलजी, कॉफी बाइट्स ह्यासारख्या अनेक जाहिरातींमध्ये काम केले. करिश्मा कपूर सोबत तिने रसनाची जाहिरात केली. त्या जाहिरातीमुळे ती खूपच लोकप्रिय झाली. ती त्याकाळी इंडस्ट्रीमधली सर्वात व्यस्त बालकलाकार समजली जायची. ती स्टार प्लसवरील शाहरुखच्या ‘क्या आप पांचवी पाच से तेज है’ ह्या शो मध्ये सुद्धा स्पर्धक बनून आली होती. तिने २००४ साली आलेल्या ‘वेल्लीनक्षत्रम’ ह्या मल्याळम चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पर्दापण केले होते. तिने ‘मिट्टी ओली’ ह्या सीरिअल मध्ये सीताची मुलगी मामिनी कुट्टीची भूमिका केली. ‘वेल्लीनक्षत्रम’ चित्रपटात तिने भुताची भूमिका केली. ‘सत्यम’ चित्रपटात तिने पृथ्वीराज ह्यांच्या भाचीची भूमिका निभावली. ‘पा’ चित्रपटात तिने अमिताभ बच्चन ह्यांच्या वर्गमैत्रीणीची भूमिका निभावली. ‘ससुराल सिमर का’ मध्ये तिने दुर्गा राणीची भूमिका निभावली.परंतु तिच्या जन्मदिवशीच अशी घटना घडली कि ज्या घटनेमुळे ती आज आपल्यात नाही आहे. १४ मे २०१२ ह्या दिवशी तरुणी अचानक हे जग सोडून गेली. ती तिची आई नीता सचदेव सोबत विमानात प्रवास करत होती. त्या दिवशी तरुणीचा १४ वा वाढदिवस होता. त्यावेळी पश्चिम नेपाळ मध्ये २० सीटर विमान कोसळले. त्यात १६ भारतीय, २ डेन्मार्क निवासी आणि विमानाच्या स्टाफची ३ माणसं होती. त्यापैकी १३ प्रवासी आणि स्टाफच्या दोघांचे निधन झाले होते. फक्त ६ प्रवासी वाचले होते. ह्या अपघातात तरुणीसोबाबत तिच्या आइचेसुद्धा दुर्दैवी निधन झाले. ११ मे २०१२ रोजी तरुणी नेपाळला जाणार होती. ट्रिपला जाण्याअगोदर ती तिच्या मित्रमैत्रिणींना भेटली, त्यांची गळाभेट घेतली. तेव्हा तिने त्यांना मस्तीत सांगितले होते कि मी तुम्हां सर्वांशी शेवटचे भेटत आहे. तिच्या मित्रांचे म्हणणे होते कि तरुणीने ह्याअगोदर कधीच आमची अशी गळाभेट घेतली नव्हती, आणि कधीच कोणत्या ट्रिपला जाण्याअगोदर अश्याप्रकारे निरोप घेतला नव्हता. जेव्हा तिच्या मित्रांनी तिला विचारले होते कि तू असं का म्हणते आहे कि शेवटचे भेटणार वैगेरे. तेव्हा तिने मस्तीत म्हटले होते कि कदाचित काय माहिती माझे विमान कोसळले वैगेरे तर. त्यामुळे तिच्या मित्रांचे मानणे असे होते कि तिचे ह्या विमानात जाणे तिच्या नशिबातच लिहिले गेले होते. तरुणी ह्या ट्रिपनंतर पुन्हा कधी परतलीच नाही.तरुणीच्या अश्या जाण्याने चित्रपटसृष्टीतल्या लोकांना खूपच धक्का बसला. तरुणी एक उत्तम कलाकार तर होतीच त्याशिवाय ती एक हुशार विध्यार्थीसुद्धा होती. तिच्या जाण्याने अनेकांनी आपले दुःख व्यक्त केले. अमिताभ बच्चन ह्यांनी ट्विट केले होते कि, ‘हे वाचताना खूपच दुःख होत आहे कि तरुणी आता ह्या जगात नाही आहे. ती खूपच प्रेमळ आणि सुंदर मुलगी होती. हे परमेश्वरा, कदाचित हि गोष्ट खरी नसायला पाहिजे होती.’ तरुणीसोबत ‘पा’ मध्ये काम केलेल्या अभिषेक बच्चन ह्याने सुद्धा दुःख व्यक्त केले होते. करिष्मा कपूरने एका जाहिरातीत तिच्या सोबत काम केले होते. तिने लिहिले होते कि, ‘हे ऐकून खूपच दुःख झाले. ती एक प्रेमळ आणि भाविनक मुलगी होती. ती खूपच हुशार होती.’ जरी तरुणी आज आपल्यात नसली तरी तिने बालवयात निभावल्या भूमिका आणि त्यांच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. जेव्हा तिने हे जग सोडले होते तेव्हा तिचे वय केवळ १४ वर्ष होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *