निरमा च्या पाकिटावर असलेली हि चिमुकली कोण आहे पहा

९० च्या दशकातील टीव्हीवर पाहिलेले प्रत्येक कार्टून, कॉमिक तुम्हांला लक्षात असेल. ह्या सोबत सर्वाना ‘वॉशिंग पावडर निरमा’ गाणं असलेली निरमाची जाहिरात तर नक्कीच लक्षात असेल. परंतु तुम्हांला माहिती आहे का निरमाच्या पॅकेटवर असलेली जी मुलगी आहे ती कोण आहे. तर चला जाणून घेऊया ‘निरमा गर्ल’ ची कथा. खरंतर निरमा वॉशिंग पावडरची सुरुवात १९६९ मध्ये गुजरातच्या कर्सन भाई ह्यांनी केली होती. निरमाच्या पॅकवर जी मुलगी दिसते ती दुसरी कोणी नसून कर्सन भाई ह्यांची मुलगी निरुपमा आहे. कर्सन भाई प्रेमाने आपल्या मुलीला निरमा बोलायचे. ते आपल्या मुलीला एक क्षण सुद्धा आपल्या नजरेपासून दूर जाऊ देत नव्हते. परंतु परमेश्वराला काही वेगळंच मंजूर होते. एकेदिवशी काही कारणास्तव निरुपमा कोठे जात असताना तिचा अपघात झाला. त्या दुर्दैवी घटनेत निरुपमाचे निधन झाले. ते आपल्या मुलीच्या निधनाने तुटून गेले. त्यांना नेहमी वाटायचे कि माझ्या मुलीने मोठे झाल्यावर नाव कमवावे आणि संपूर्ण जगाने तिला ओळखावे. परंतु तसे काही घडू शकले नाही. त्यामुळे मग त्यांनी आपल्या मुलीला अमर करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी निरमा वॉशिंग पावडरची निर्मिती केली आणि पॅकेटवर निरमाचा फोटो लावायला सुरुवात केली. त्यांनी तीन वर्षापर्यंत एका अनोख्या वॉशिंग पावडरचा फॉर्मुला बनवला आणि वॉशिंग पावडरची विक्री सुरु केली. परंतु ह्या दरम्यान कर्सन भाई ह्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली नाही. ते आपल्या सायकलने ऑफिसला जायचे आणि रस्त्यावर लोकांच्या घरी निरमा वॉशिंग पावडर विकायचे. त्याकाळी बाजारात सर्फ सारखे वॉशिंग पावडर होते. त्यांची किंमत १५ रुपये प्रति किलो असायची. परंतु कर्सन भाई निरमा वॉशिंग पावडर फक्त साडेतीन रुपये किलोने विकायचे. जवळच्या एरियातील कमी पगार असलेल्या लोकांसाठी निरमा एक चांगला पर्याय त्यामुळे होता. अशामध्ये निरमाची चांगली विक्री सुरु झाली. हळूहळू कर्सन भाईंच्या अहमदाबाद शहरात निरमा लोकप्रिय होऊ लागला. निरमा बनवण्यापासून ते विकण्यापर्यंत सर्व कामे कर्सन भाईच करत होते. त्यावेळी त्यांना वाटले आता वेळ आहे नोकरी सोडण्याची. तेव्हा निरमाने फक्त गुजरात मध्येच नाही तर संपूर्ण भारतात आपली ओळख बनवली होती. निरमा साठी कर्सन भाईनी मग एक टीम बनवली, जी आसपासच्या दुकानदारांना पावडर विकण्याचे काम करत होते. परंतु आता समस्या सुद्धा येऊ लागल्या होत्या. कर्सन भाईंनी अनेकांना उधारीवर माल दिले होते, परंतु जेव्हा कोणी दुकानदाराकडे पैसे मागायला जायचे तेव्हा अनेक दुकानदार वेगवेगळे कारण सांगून पैसे देत नसत आणि उरलेले पॅकेट पण पुन्हा त्यांच्या टीम कडे द्यायचे.ह्यावर कर्सन भाईंनी खूप विचार केला आणि आपल्या टीम सोबत एक मिटिंग घेतली. त्यांनी सांगितले कि बाजारात जितके पण निरमा पावडर आहेत ते सर्व परत घ्या. टीमला काहीच समजत नव्हते परंतु त्यांना कर्सन भाई वर विश्वास होता. ह्यामुळे सर्वांनी तसेच केले जसे कर्सन कर्सन भाईंनी सांगितले होते. टीमला हे सुद्धा वाटले कि कदाचित आता निरमा बंद होणार. ह्याउलट कर्सन भाईंचे डोकं खूप जोरात चालत होते. त्याकाळी टीव्ही बाजारात आला होता. त्यांनी विचार केला कि आताच खरी वेळी आहे जाहिरातीत पैसे गुंतवायची. त्याकाळी वस्तूंवर खूपच कमी जाहिराती होत होत्या. तेव्हा निरमाची जाहिरात टीव्हीवर येऊ लागली. टीव्हीवरच्या जाहिरातीत पहिल्यांदा जेव्हा ‘वॉशिंग पावडर निरमा’चे गाणे आले तेव्हा त्या झिंगलने सर्वांनाच आकर्षित केले. मग काय होतं, जाहिरात लोकप्रिय होताच, निरमाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली. प्रत्येकाच्या ओठांवर ‘वॉशिंग पावडर निरमा’ च्या जाहिरातीतल्या ओळी येऊ लागल्या. प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानातून निरमाच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. ह्यामध्ये ते लोकं सुद्धा होते ज्यांनी एकेकाळी कर्सन भाईंच्या टीमला निरमाचे पॅकेट्स पुन्हा परत केले होते. परंतु आता कर्सन भाई आपल्या चुकांपासुन शिकले होते. त्यांनी निर्णय घेतला होता कि एकही पॅकेट उधारीवर देणार नाही. कर्सन भाईंचा फॉर्म्युला हिट ठरला होता. आणि ह्यासोबतच त्यांचे आपल्या मुलीला अमर करण्याचे स्वप्न सुद्धा पूर्ण झाले. आजसुद्धा ‘वॉशिंग पावडर निरमा’ म्हटल्यावर आपल्या डोळ्यांपुढे जो फोटो येतो, हा फोटोच कर्सन भाईंचे स्वप्न होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *