सलमान, रणवीर सारख्या मोठ्या अभिनेत्यांना देखील मिथुन चा हा रेकॉर्ड तोडता आला नाही

‘कुली’ चित्रपटादरम्यान जेव्हा अमिताभ बच्चन ज खमी झाले होते तेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर लाखोंच्या संख्येने त्याचे चाहते एकत्र होऊन त्याच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. आजच्या घडीला अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, ह्रितिक रोशन कुठेही जातात तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी तिथे लाखोंच्या संख्येने चाहते गर्दी करतात. हे असते स्टारडम. परंतु तुम्हांला कदाचित माहिती नसेल कि बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त स्टारडमचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे ते. तर मित्रांनो त्या अभिनेत्याचे नाव आहे मिथुन चक्रवर्ती. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कधी मिथुन चक्रवर्ती एका रात्रीत स्टार बनले होते, का त्यांचे स्टारडम इतके मोठे आहे आणि कसे त्यांच्या स्टारडमचा रेकॉर्ड आजही कायम आहे.
१९८१ ची गोष्ट आहे, त्यादरम्यान मिथुन चक्रवर्ती हे ‘तकदीर का बादशाह’ ह्या चित्रपटाची शूटिंग करत होते. चित्रपटाच्या सेटवर एक दिवस मिथुन चक्रवर्ती एका बाजूला कोपऱ्यात उदास होऊन बसले होते. बी सुभाष ह्यांनी जेव्हा मिथुनला ह्या अवस्थते पाहिले तेव्हा त्यांनी मिथुनला विचारले कि तू उदास का बसला आहेस. तेव्हा मिथुन चक्रवर्ती ह्यांनी बी सुभाष ह्यांच्यासोबत आपले दुःख शेअर केले. त्यांनी सांगितले कि मी खूप मेहनत करत आहे, रात्रंदिवस काम करत आहे. परंतु आयुष्य पुढे जातच नाही आहे. काहीच भेटत नाही आहे. आणि कुठे ना कुठे मी हरलो आहे ह्या आयुष्याशी. त्यादिवशी बी सुभाष ह्यांनी मिथुन चक्रवर्ती ह्यांना हिंमत देऊन सांगितले कि तू चिंता करू नको मी तुझ्यासाठी एक नवीन चित्रपट बनवतो ज्याने तुझी पूर्ण इमेज बदलून जाईल.

बी सुभाष ह्यांनी मिथुनला जे वचन दिले होते ते वचन त्यांनी पूर्ण केले. काही दिवसानंतर बी सुभाष ह्यांनी मिथुन चक्रवर्ती ह्यांना ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट ऑफर केला. चित्रपटात मिथुन चक्रवर्ती एका डान्सरची भूमिका करतात ज्याचे नाव असते ‘जिमी’. हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा खरंच ह्या चित्रपटाने मिथुन चक्रवर्तींना एकारात्रीत स्टार बनवले होते. हा चित्रपट एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता आणि ह्या चित्रपटाची गाणी सुपरडुपर हिट होती. मग ते ‘जिमी जिमी जिमी आजा आजा आजा’ हे गाणं असो कि ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाचे शीर्षक गाणे असो किंवा मग ‘याद आ रहा है तेरा प्यार’ हे गाणे असो. हि सर्वच गाणी त्यावेळी प्रत्येकांच्या ओठांवर होती. हा चित्रपट बॉलिवूडच्या त्या मोजक्या चित्रपटांपैकी एक होता जो फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभर लोकप्रिय झाला. भारताप्रमाणेच परदेशात हा चित्रपट खूप चालला. रशियात तर ह्या चित्रपटाने धुमाकूळच घातला होता. ह्या चित्रपटामुळे मिथुन चक्रवर्ती ह्यांचे चीन आणि रशिया मध्ये खूप चाहते झाले. ‘डिस्को डान्सर’ नंतर मिथुन चक्रवर्ती स्टार बनवले होते. त्यानंतर त्यांना एका इव्हेंटसाठी कझाकिस्तानला जावे लागले.ज्यादिवशी मिथुन चक्रवर्ती कझाकिस्तान गेले होते त्याच दिवशी तेथील राष्ट्रपतींचे एक भाषण होणार होते. परंतु मिथुन चक्रवर्ती जेव्हा एअरपोर्टवर गेले तेव्हा एअरपोर्टच्या बाहेर तब्बल दहा लाख लोकं त्यांची एक झलक पाहण्यासाठी जमले होते. कझाकिस्तानच्या जनतेला माहिती होते कि आज मिथुन चक्रवर्ती येथे येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी व त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते सर्व लोकं तिथे जमले होते. आणि ज्यावेळी मिथुन चक्रवर्ती एअरपोर्ट वरून बाहेर आले तेव्हा त्या दहा लाख लोकांनी एकत्र ‘जिमी जिमी’ म्हणून त्यांचे स्वागत केले. परिस्थिती अशी झाली होती कि दहालाख लोकं एकत्र मिथुनला पाहण्यासाठी एअरपोर्ट वर जमल्यामुळे, तिथल्या राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कुणीही गेले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपतींना त्यांचा इव्हेंट रद्द करावा लागला. बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याही सुपरस्टारला पाहण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोकं आजपर्यंत आले नाहीत. हि गोष्ट आहे आजपासून ३० वर्षाअगोदरची म्हणजे ८० च्या दशकातली. तर तुम्हांला अंदाज आला असेल त्याकाळी मिथुन चक्रवर्ती फक्त भारतातच नव्हे तर जगभरात किती लोकप्रिय झाले होते ते. आणि हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणत्याही सुपरस्टारला मोडता आलेला नाही. स्टारडमचा हा त]रेकॉर्ड आजसुद्धा मिथुन चक्रवर्ती ह्यांचा नावावरच आहे. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगितले कि कश्याप्रकारे सर्वात मोठा स्टारडमचा रेकॉर्ड मिथुन चक्रवर्ती ह्यांच्या नावावर आजसुद्धा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *