‘काटा लगा’ गाण्यामधली डीजे डॉल आता कुठे आहे पहा

२००२ मध्ये एक गाणं आलं होतं ‘कांटा लगा’, हे मूळ गाणं १९७२ मध्ये आलेल्या ‘समाधी’ चित्रपटाचे गाणे होते. २००२ मध्ये ह्या गाण्याला एका म्युजिक व्हिडीओसाठी रिमिक्स केले गेले. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. ह्या गाण्यात दिसणारी शेफाली जरीवाला रातोरात स्टार बनली होती. ‘काटा लगा’ हे गाणं इतकं लोकप्रिय झालं होतं कि लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांच्या मनात शेफालीने एक वेगळीच जागा बनवली होती. सर्व लोकं शेफालीचे दिवाने झाले होते. परंतु वेळेनुसार लोकं ह्या गाण्याला विसरून गेले आणि ह्या गाण्यामध्ये डान्स करण्याऱ्या शेफालीला सुद्धा. त्या गाण्यानंतर काही दिवसानंतर शेफाली सुद्धा जास्त कुठेच दिसली नाही. लोकं पण तिला विसरले होते. ती कुठे गेली, आता काय करते आहे ह्या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेणार आहेत. शेफालीचा जन्म एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला, जे मुंबईत राहत होती. कलकत्ता येथून शाळेचे शिक्षण घेतल्यानंतर ती मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. तिचे स्वप्ने सुद्धा खूप मोठे नव्हते, आयटी मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तिला एमबीए करायचे होते आणि त्यानंतर तिला सेटल व्हायचे प्लॅन होते. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

एके दिवशी ती आपल्या कॉलेजच्या बाहेर उभी होती, तिथे एक दिग्दर्शक आला. त्याने तिला एक म्युजिक व्हिडीओ करायची ऑफर दिली आणि सांगितले कि तिचे आयुष्य बदलेल. शेफालीने असे काही करण्याबद्दल विचार सुद्धा केला नव्हता. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसे तिचे दुरदुरबद्दल कोणते नाते नव्हते. त्यामुळे ती द्विधा मनस्थितीत होती. परंतु पॉकेटमनीचा विचार करून तिने हि ऑफर स्वीकारली. ह्यानंतर असे घडले ज्याचा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. ‘कांटा लगा’ रिलीज झाले आणि डिस्को, लग्न, पार्टी, ऑटोरिक्षा पासून ते रिंगटोनपर्यंत जाऊन पोहोचला. शेफाली ने ‘काटा लगा’ शिवाय अजून काही अल्बम मध्ये काम केलेले आहे, परंतु तिला त्या अल्बम मधून तितके नाव कमावता आले नाही. इंडस्ट्री मध्ये शेफालीला आयटम गर्लच्या नावाने ओळखले जात होते आणि तिची तुलना राखी सावंत सोबत केली जायची. जे तिला कधीच आवडायचे नाही. शेफाली बद्दल हे माहिती जाणून तुम्ही हैराण व्हाल कि तिने दोन लग्ने केली आहेत. तिने २००५ मध्ये ‘मीट ब्रोज’ मधील गायक हरमीत गुलजार सोबत लग्न केले होते. परंतु हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि २००९ मध्ये ते वेगळे झाले.२०१४ मध्ये तिने आपला डान्स पार्टनर व अभिनेता पराग त्यागी सोबत लग्न केले. लग्नानंतर ती पूर्णपणे टीव्ही इंडस्ट्री पासून दूर होती. ‘कांटा लगा’ गाण्यानंतर तिने सलमान खान आणि प्रियांका चोप्रा ह्यांच्यासोबत ‘मुझसे शादी करोगी’ ह्या चित्रपटात बिजली नावाच्या मुलीची छोटीशी भूमिका केली होती. चित्रपटानंतर शेफाली अभिनयापासून काही काळ लांब राहिली होती. पण २०१२ मध्ये ‘नच बलिए 5’ मध्ये ती आपला खास मित्र पराग त्यागी सोबत दिसली. गेल्या वर्षीच्या तिने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. इतक्या वर्षात अभिनयापासून दूर पळणारी शेफालीने २०१८ मध्ये ऑल्ट बालाजीच्या ‘बेबी कम ना’ ह्या वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाचे पर्दापण केले. ह्या शो मध्ये तिने श्रेयस तळपदे आणि फरहाद सामजी ह्यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर तिने एकता कापूरच्याच ‘बू सबकी फटेगी’ ह्या कॉमेडी सिरीजमध्ये काम केले आहे. तिने पुन्हा इंडस्ट्रीमध्ये जम बसवण्यास सुरुवात केली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *