मिथुन ला अमिताभ चित्रपटामधून काढणार होता त्यावेळी मिथुनने दिलेली धमकी

अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती हे दोघेही बॉलिवूडचे खूप मोठे कलाकार आहेत. आताचे अभिनेते ह्या दोघांना आपले आयडॉल मानतात. परंतु आम्ही तुम्हांला आज ह्या दोघांबद्दल एक असा किस्सा सांगणार आहोत जे वाचून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. ९० च्या दशकात अमिताभ बच्चन ह्यांचे चित्रपट फ्लॉप होत होते. तर दुसरीकडे मिथुन चक्रवर्ती एकापेक्षा एक हिट चित्रपट देत होता. त्यामुळे त्याला छोट्या निर्मात्यांचा अमिताभ बच्चन बोललं जात होते. मिथुनच्या ह्या यशामुळे अमिताभ बच्चन ह्यांना बॉलिवूडमधील आपले नंबर एकचे स्थान घसरत असल्यासारखे वाटू लागले होते. ह्याउलट निर्माता यश जोहरने त्यांना मिथुन सोबत ‘अग्निपथ’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली तेव्हा अमिताभ त्यांना नकार देऊ शकले नाही. कारण यश जोहरने त्यांच्यासाठी अनेक हिट चित्रपट बनवले होते. ह्यामुळे त्यांना नकार देणे अमिताभला शक्य नव्हते. खरं तर ‘अग्निपथ’ हा चित्रपट अमिताभ बच्चन ह्यांच्या स्टारडमला पुन्हा उभा करण्यासाठी बनवला गेला होता.

ह्यात मिथुन चक्रवर्ती एक साऊथ इंडियन कॅरॅक्टर ‘क्रिष्णन अय्यर एम ई नारळपाणीवाल्या’ची भूमिका निभावत होते. मिथुनने ह्या भूमिकेला खूपच आव्हानात्मक पद्धतीने घेतले होते. कारण त्याला चित्रपटात कोणत्याही प्रकारे अमिताभसमोर कमी दिसायचे नव्हते. हळू हळू त्याची भूमिका आकार घेऊ लागली तेव्हा निर्देशक मुकुल एस आनंद ह्यांना जाणीव झाली कि हे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडणार आहे. ह्यामुळे त्याच्या भूमिकेवर अजून मेहनत घेतली गेली. जेव्हा अमिताभ बच्चन ह्यांना हे सर्व माहिती होत गेले तेव्हा त्यांना स्वतःला इनसिक्युर वाटले. त्यांना वाटले कि माझे धमाकेदार डायलॉग असून सुद्धा सर्व टाळ्या मिथुनच्या वाट्याला जाणार आहेत. चित्रपट जेव्हा बनून पूर्ण झाला तेव्हा अमिताभला जे वाटले होते ते खरे निघाले. छोटीसी भूमिका असूनही मिथुन संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन गेलेला दिसला होता. त्याच्या भूमिकेचा प्रभाव संपूर्ण चित्रपटात दिसत होता.ह्यामुळे अमिताभ बच्चन ह्यांनी मुकुल आनंद ह्यांना मिथुनचा रोल कमी करायला सांगितला. मुकुल आनंद ह्यांना अमिताभ बच्चन ह्यांचा हा आदेश टाळणे शक्य नव्हते. ह्यामुळे पूर्ण बनलेला चित्रपट पुन्हा एडिटिंग टेबल वर गेला. मिथुनला जेव्हा ह्या गोष्टीची माहिती झाली तेव्हा तो खूप नाराज झाला. त्याने मुकुल एस आनंदला खरंखोटं सुनावत कायदेशीर कारवाई करण्याची धम की दिली. कायदेशीर कारवाईमध्ये अडकून चित्रपट फसू नये म्हणून निर्माता यश जोहरने चित्रपट रिलीज करण्याची घोषणा केली. चित्रपट रिलीज झाला तेव्हा मिथुनच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. ह्या भूमिकेसाठी मिथुनला ‘बेस्ट सपोर्टींग ऍक्टर’चा अवार्ड सुद्धा मिळाला. ह्याप्रकारे अमिताभ बच्चन मिथुनचा रोल कमी करायचा असून देखील त्यांना तसं करता आले नाही. ज्यासाठी ते अनेकदा चर्चेत असायचे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *