aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

अक्षय कुमारपेक्षा खूप जास्त श्रीमंत आहे त्याची बहीण, भारतातील श्रीमंत कुटुंबात आहे ती

अक्षय कुमारचे खरे नाव तर सर्वांनाच आता माहिती आहे ते म्हणजे राजीव भाटिया. परंतु अक्षयच्या परिवारातील एक व्यक्ती जिला खूपच कमी लोकं ओळखतात ती म्हणजे त्याची बहीण अल्का भाटिया. दोघे बहीण भाऊ अमृतसर मध्ये एका मिलिटरी ऑफिसरच्या घरी जन्माला आले. अक्षय कुमारच्या वडिलांचे नाव हरिओम भाटिया, जे एक मिलिटरी ऑफिसर होते. अक्षय कुमारच्या आईचे नाव अरुणा भाटिया. यात काही शंका नाही कि अक्षय कुमार आजच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वात जास्त फी घेणारा अभिनेता आहे. त्याची प्रॉपर्टी करोडोंमध्ये आहे. त्याचे ऍक्टिंग व्यतिरिक्त अनेक बिझनेस सुद्धा आहेत. आजच्या घडीला असे बोललं जातं कि तो बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत हिरोंपैकी एक आहे. परंतु तुम्हांला हे माहिती नसेल कि त्याची छोटी बहीण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. ते सुद्धा कोणत्याही कामाशिवाय आणि कोणत्याही बिझनेसशिवाय. चला तर आम्ही तुम्हांला सांगतो कि कश्याप्रकारे आहे अक्षयची बहीण त्याच्यापेक्षाही जास्त श्रीमंत, कोण आहे त्याच्या बहिणीचा पती आणि कश्याप्रकारे अक्षयच्या बहिणीचे झाले लग्न. २३ डिसेंबर २०१२ मध्ये अक्षयची बहीण अल्का भाटिया अचानक लग्नामुळे चर्चेत आली.

ह्याचे चार मुख्य कारण होते, एक म्हणजे ती अक्षयची बहीण आहे आणि ती लग्न करत होती. दुसरे कारण म्हणजे ती ४० वर्षाची होती आणि ती तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करत होती. तिसरे कारण म्हणजे अल्का आणि सुरेंद्र हिरानंदानी ज्याच्याशी ती लग्न करत होती ह्या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. चौथे कारण म्हणजे सुरेंद्र हिरानंदानी ज्याच्याशी अल्का भाटिया लग्न करणार होती त्यांचा भारताच्या सर्वात १०० श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होतो. अक्षय कुमारला जेव्हा माहिती पडले कि त्याची बहीण ४० व्या वर्षी दुसरे लग्न करत आहे तेव्हा तो ह्या नात्याने जरा सुद्धा खुश नव्हता. कारण अल्काला पहिल्या पतीपासून अगोदरच एक मुलगी होती. अक्षयच्या नाखूश होण्याचे दुसरे कारण हे सुद्धा होते कि त्याच्या बहिणीचा होणारा नवरा तिच्यापेक्षा १५ वर्षांने मोठा होता. इतकंच नाही, तर त्याच्या मुलीचे वय सुद्धा लग्नाच्या वयाचे झाले होते. सुरेंद्र हिरानंदानी अगोदरच तीन मुलींचे वडील होते. त्याने २०११ मध्ये त्याच्या पहिल्या पत्नी प्रीतीला सोडले होते जे तिच्याबरोबर ३० वर्ष लग्नाच्या नात्यात होते. परंतु बहिणीच्या ह्या हट्टापुढे अक्षय कुमारने सुद्धा हार मानली. शेवटी त्याने सुद्धा हे नाते स्वीकारले. नंतर त्याच्या बहिणीचे लग्न केले.आता जर गोष्ट सुरेंद्र हिरानंदानीच्या प्रॉपटी बद्दल करत असाल, तर त्यांचे आडनावच पुरेसे आहे. सर्वांना माहितेय कि हिरानंदानींचे भारताच्या अनेक मोठ्या शहरात मोठे मोठे टॉवर्स आहेत. हिरानंदानी शाळा, हिरानंदानी हॉस्पिटल्स आणि सुरेंद्र हिरानंदानी स्वतः ‘हाऊस ऑफ हिरानंदानी’चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ‘हाऊस ऑफ हिरानंदानी’ एक टॉप बिजनेस ग्रुप आहे, जो भारतात हाऊसिंग आणि रिअल इस्टेट च्या सेक्टर मध्ये काम करतो. जी व्यक्ती भारताच्या सर्वात १०० श्रीमंत व्यक्तींपैकी एक असेल तर तुम्हांला अंदाज आलाच असेल कि त्या व्यक्तीची कमाई किती असेल. आज अल्का भाटिया सुरेंद्र हिरानंदानी सोबत आपले वैवाहिक जीवन खूप चांगल्याप्रकारे जगत आहे. ह्याशिवाय अक्षय कुमारने सुद्धा आपल्या बहिणीला आपल्यापासून लांब ठेवले नाही. लग्नानंतरसुद्धा अक्षय कुमार आणि त्याची बहीण एकाच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. २०१४ साली अल्का भाटिया ‘फगली’ चित्रपटाद्वारे चित्रपट प्रोड्युसर बनली. ह्या चित्रपटाची ती सहनिर्माती होती. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला अक्षय कुमारच्या छोट्या बहिणीबद्दल सांगितले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *