वेटरचे काम करताना अक्षयला त्याच्या या तीन इच्छा पूर्ण करायच्या होत्या

अमिताभ बच्चन हे मेगास्टार आहेत, आयुष्यात सर्वकाही मिळवलं. परंतु त्यांच्या मनात हि खंत तर जरूर असेल कि त्यांची एबीसीएल (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड) कंपनी यशस्वी व्हायला पाहिजे होती. त्यांच्या मुलाचे करियरसुद्धा त्यांच्यासारखे बनायला पाहिजे होते. आमिर खान अभिनयाच्या बाबतीत परफेक्टनिस्ट नक्कीच आहे परंतु त्याला सुद्धा त्याच्या वैयक्तिक जीवनात परफेक्ट होता आले नाही. त्याला दुसरे लग्न करावे लागले. सलमान खानला चित्रपटात आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी अनके माणसं भेटली. परंतु त्याच्या आयुष्यातील एकटेपणा घालवण्यासाठी त्याला अजूनपर्यंत जीवनसाथी मिळाली नाही. परंतु जर आपण अक्षय कुमार बद्दल बोलू तर तो अभिनयक्षेत्रात सुद्धा यशस्वी आणि त्याच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा तितकाच यशस्वी आहे. म्हणून तर अक्षयकुमार छातीठोकपणे बोलतो कि सध्याच्या आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे कि त्याला त्याची खंत वाटेल. कारण त्याच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहेत काय होत्या अक्षय कुमारच्या त्या इच्छा आणि त्याने कश्या त्या इच्छा पूर्ण केल्या.

असं नाही आहे कि अक्षय कुमारला आयुष्यात सर्वकाही सहज मिळालं. चित्रपटसृष्टीत आल्यापासुन १० वर्ष त्याने हिट वर हिट चित्रपट दिले तरीही तेव्हासुद्धा तो ब्रि-ग्रेड अभिनेता म्हणूनच ओळखला जात होता. उलट एक काळ असा सुद्धा होता अक्षय कुमारच्या आयुष्यात जेव्हा त्याचे एका मागोमाग एक असे १४ चित्रपट फ्लॉप झाले. तेव्हा इंडस्ट्रीमध्ये सर्वांना वाटलं होतं कि अक्षय कुमार आता संपला आहे. बॉलिवूडमधून त्याच वजन जणू काही संपल्यात जमा झाले होते. कोणीही त्याला काम देण्यास तयार नव्हते. परंतु अश्यावेळी अक्षय कुमार खचला नाही. ह्याचे कारण तो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे. अक्षय कुमार मार्शल आर्टस् प्रेमी आहे. तो मार्शल आर्ट तेव्हापासून करतो जेव्हा त्याचे बॉलिवूडमध्ये पर्दापण सुद्धा झाले नव्हते. ह्याच मार्शल आर्टने अक्षय कुमारला अनेकवेळा आयुष्याच्या वेगवेगळ्या संकटातून बाहेर काढले आहे.अक्षय कुमारने स्वतः आपला हा अनुभव एका मुलाखतीत सांगितला. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अक्षय कुमार बँकॉकच्या एक छोट्याश्या धाब्यावर कुकसुद्धा होता आणि वेटरचे काम सुद्धा करायचा. कारण त्याला तिथे मार्शल आर्टचा सराव करायला मिळायचा. ज्या छोट्याश्या जागेवर तो काम करायचा, त्याच्या मागच्याच भिंतीवर अक्षय कुमार आणि त्याच्या दोन मित्रांनी आपल्या आपल्या आवडत्या सेलेब्रेटींचे फोटो लावले होते. तेव्हा अक्षयने त्याच्या भिंतीवर सिल्वेस्टर स्टेलॉन, श्रीदेवी आणि जॅकी चॅन ह्यांचे फोटोज लावले होते. कारण अक्षय कुमार ह्या तिघांनाही आपला आदर्श मानायचा. त्याची इच्छा होती कि आयुष्यात एकदा तरी ह्या तिघांसोबत भेट व्हावी. परंतु आयुष्याने ह्यापेक्षा कितीतरी पटीने त्याला दिले. अक्षय कुमारने श्रीदेवी सोबत ‘मेरी बीवी का जवाब नही’ ह्या चित्रपटात काम केले. ह्या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रीदेवी असल्याने ह्या चित्रपटात आपण काम केल्याचे त्याने सांगितले. जरी ह्या चित्रपटाला रिलीज व्हायला १० वर्ष वाट पाहावी लागली आणि ह्या चित्रपटाला क्लायमॅक्स शिवायच रिलीज केले गेले होते.तरीही हा चित्रपट अक्षय कुमारसाठी खूप खास आहे. कारण ह्या चित्रपटामुळे त्याची पहिली इच्छा म्हणजे श्रीदेवीला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली होती. ह्यानंतर त्याला ‘कंबख्त इश्क’ ह्या चित्रपटाद्वारे त्याची दुसरी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली. कारण ह्या चित्रपटात सिल्वेस्टर स्टेलॉनची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. हीच वेळ होती जेव्हा अक्षय कुमारची सिल्वेस्टर स्टेलॉन सोबत भेट सुद्धा झाली आणि त्याची दुसरी इच्छा सुद्धा पूर्ण झाली. नंतर अक्षय कुमारला त्याची इच्छा पूर्ण करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. त्याने जॅकी चॅन सोबत एका प्ले मध्ये परफॉर्म केले. अश्याप्रकारे त्याची तिसरी इच्छा सुद्धा पूर्ण झाली. ह्यामुळे जेव्हा अक्षय कुमारला विचारलं जाते कि आता तुझ्या कोणत्या इच्छा बाकी आहेत तेव्हा तो सांगतो कि मी माझ्या आयुष्यात जे जे मागितले आहे ते ते सगळं मला मिळालं आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे. बघा अक्षय कुमारने शेअर केलेला हा अनुभव.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *