आयपीएल मध्ये होतो इतका मोठा फायदा, म्हणून शाहरुख, अंबानी लावतात पैसे

२००७ साली भारताने पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकल्यामुळे एकंदरीतच क्रिकेट विश्वातील समीकरणच बदलून गेली, त्यातलाच एक भाग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल. आत्तापर्यंत आयपीएलचे बारा हंगाम झाले आहेत. इतकंच नव्हे तर पुढच्या म्हणजेच तेराव्या हंगामाच्या लिलावाची तारीख सुद्धा ठरली आहे. १९ डिसेंबर ही तेराव्या हंगामाच्या लिलावाची तारीख आहे. क्रीडाविश्वातील आयपीएल ही अशी एक टूर्नामेंट आहे, ज्यात मोजता येणार नाही इतका पैसा खर्च केला जातो. खेळाडूच्या खरेदी-विक्री पासून ते टीमच्या मार्केटिंग पर्यंत इतकच नव्हे तर आयपीएलच्या ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी साठी सुद्धा अमाप पैसा खर्च होतो सिने क्षेत्रापासून ते उद्योग क्षेत्रापर्यंत प्रत्येक जण आयपीएलमधील सामन्यांच्या निकालांवर लक्ष ठेवून असतो. आपण कधी विचार केला आहेत का शाहरुख खान किंवा नीता अंबानी यासारख्या मोठ्या उद्योगपतींनी आपापल्या संघावर इतका पैसा का लावला असेल?

लिलावाच्या वेळी खेळाडूंना करोडोंची बोली लागते याशिवाय खेळाडूंचा येण्या-जाण्याचा खर्च तसेच कोचिंग आणि इतर स्टेप्स खर्चदेखील फ्रेंचाइजींना करावा लागतो, त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की या किंवा अशा अनेक खर्चाची भरपाई कशी होत असेल? कोणत्याही टीमच्या कमाईत मोठा हिस्सा स्पॉन्सर्सचा असतो खेळाडूंना दिले जाणाऱ्या जर्सी, शूज, क्रिकेट किट, सारं काही स्पॉन्सर्सतर्फे दिले जाते. वेगवेगळ्या कंपन्या म्हणजेच स्पॉन्सर्स संघ मालकांशी संपर्क करतात. आपल्या संस्थेचा किंवा कंपनीचा लोगो जर्सीवर दिसला तर त्या प्रॉडक्ट/सर्विसची मागणी वाढू शकेल या हेतूने स्पॉन्सर्स संघ मालकांना काही ठराविक रक्कम देतात. संघाच्या एकूण कमाईच्या तीस टक्के हिस्सा हा स्पॉन्सर्स मार्फत येतो.सिनेमाप्रमाणे आयपीएल टीम कडून मीडिया राईट्स मार्फत कमाई केली जाते आयपीएलच्या सामन्यांचे ब्रॉडकास्टिंगचे मिडीया राईट्स बीसीसीआय वाहिन्यांना विकते. यातुन होणाऱ्या कमाईचा मोठा वाटा संघ मालकांनी बनवलेल्या ऍग्रीमेंटनुसार वाटला जातो. गुणतक्त्यातील स्थानानुसार नफ्याचं विभाजन केले जाते. माहितीनुसार, एकुण कमाईच्या ६० टक्के हिस्सा मिडिया राईट्स मुळेच मिळतो. सध्या डिजीटल आणि टीव्ही ब्रॉडकास्टिंग दोन्हीचे राईट स्टार नेटवर्क कडे आहेत. तिकीटांच्या होणाऱ्या विक्रीमधून देखील आयपीएलच्या संख्यांची कमाई होते अशातच जेवढे जास्त चाहते तेवढी जास्त कमाई हे साधे सूत्रवापरले जाते. फ्रेंचाइजींकडून या कमाईचा काही हिस्सा स्टेट असोसिएशनला सुध्दा दिला जातो. तिकिटविक्रीतुन होणारी कमाई शहर आणि त्या स्टेडियमची आसन क्षमता यावर अवलंबून असते.संगत जेवढे नामांकित मोठे खेळाडू असतील तेवढी जास्त कमाई होईल. थोडक्यात हा सगळा ब्रँड व्हॅल्यूचा प्रकार हो. असं समजा की महेंद्रसिंग धोनी विराट कोहली क्रिस गेल सारखे खेळाडू ज्या टीम मध्ये असतील त्या टीमला स्पॉन्सर आणि इन्वेस्टर(गुंतवणूकदार) जास्त येतील/मिळतील. मैदानाच्या बाहेर म्हणजे पॅवेलीयन किंवा स्टँडस मध्ये जर शाहरुख खान, प्रिती झिंटा सारखे सेलेब्रिटी सामना बघायला आले असतील तर त्या सामान्यांनाही प्रेक्षक मोठया संख्येने प्रेक्षक सामना बघायला येतातच त्याशिवाय टीव्ही प्रेक्षकांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ बघायला मिळते. आयपीएलची एकूण प्राईस मनी ३४ करोड रुपये आहे. तुम्हाला वाटलं असेल की प्राईस मनीमधील काही रक्कम संघ मालक घेत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुक आहे कारण प्राईस मनीच्या दुप्पट-तिप्पट रक्कम त्यांनी खेळाडूंना विकत घेण्यासाठी खर्च केलेली असते. त्यामुळे बक्षीसाची ही रक्कम वैयक्तिक न राहता तिला संघाच्या उत्पन्नात जोडले जाते. जिंकणाऱ्या किंवा हारणाऱ्या संघातील खेळाडूंना ही प्राईस मनीची इन्सेंटिव्हच्या रुपात दिली जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *