आमिरला सगळे फ्लॉप अभिनेता ठरवताना या चित्रपटाने बदलले त्याचे नशीब

आमिर खान हे बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला खूप मोठे नाव आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळेपणा असतो ज्यामुळे लोकं त्याचा चित्रपट आला कि चित्रपटगृहात गर्दी करतात. अनेकजण त्याच्या अभिनयाचे दिवाने आहेत. आमिर खानचा अभिनय, त्याचे चित्रपट आणि कामाप्रती असलेली त्याची परिपक्वता पाहून बॉलिवूडचे लोकं त्याला मिस्टर परफेक्टनिस्ट बोलतात. तो सगळ्यापासून युनिक आहे, तो सगळ्यांपासून वेगळा आहे. पण तुम्हांला हे जाणून विचित्र वाटेल कि ह्याच आमिर खानला ज्याला आज लोक मिस्टर परफेक्टनिस्ट बोलतात त्याला एकेकाळी ८० च्या दशकातल्या फ्लॉप हिरोची सेकंड कॉपी बोलून तुलना केली होती. आजच्या लेखात आम्ही तुम्हांला हेच सांगणार आहोत, कि केव्हा आमिर खानला सेकंड कॉपी बोलले गेले, का असे त्याला बोलले गेले आणि आमिर खानने ह्या गोष्टीला कसे चुकीचे ठरवले. गोष्ट आहे १९९० सालची, इंदरकुमार एक चित्रपट बनवत होते, चित्रपट होता ‘दिल’. ह्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला घेतले होते. तर मुख्य अभिनेता म्हणून आमिर खानला निवडले होते.

जेव्हा इंदरकुमार ह्यांनी मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसाठी आमिर खानला घेतले तेव्हा इंडस्ट्रीमध्ये त्यांना खूप बोलणे ऐकावे लागले. खूप लोकांनी येऊन त्यांना सांगितले कि आमिर खानला त्यांनी चित्रपटात घेतले आहे हा खूप चुकीचा निर्णय आहे. ते असं का म्हणाले हे आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. आमिर खानच्या चित्रपट करियरची सुरुवात तर चांगली झाली होती. ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यानंतर आमिरने ‘राख’, ‘लव्ह लव्ह लव्ह’, ‘तुम मेरे हो’ आणि ‘अव्वल नंबर’ हे चित्रपट केले. परंतु हे सर्व चित्रपट फ्लॉप गेले. ह्यानंतर आमिरने एक अजून चित्रपट केला होता माधुरी दीक्षित सोबत. त्या चित्रपटाचे नाव होते ‘दिवाना मुझ सा नही’ हा चित्रपट बनून पूर्ण झाला होता. परंतु ह्या चित्रपटाला त्यावेळी कोणीच विकत घेण्यासाठी तयार नव्हता. कारण आमिर खानचे मार्केट खराब होते म्हणून कोणीही डिस्ट्रिब्युटर त्याच्यावर पैसे लावण्यास तयार नव्हता. हेच कारण होते कि इंडस्ट्रीच्या लोकांनी इंदरकुमार ह्यांना सावध केले होते कि आमिर खानला ह्या चित्रपटात घेऊ नका कारण जर तुम्ही ह्या चित्रपटात आमिर खानला घेतले तर ‘दिवाना मुझ सा नही’ सारखा ह्या चित्रपटाला सुद्धा कोणी डिस्ट्रिब्युटर मिळणार नाही.ह्यापलीकडे इंदरकुमारला लोकांनी हे सुद्दा सांगितले होते कि आमिरच्या जागी ह्या चित्रपटात तुम्ही तुमच्या जवळचा मित्र अनिल कपूरला सुद्धा घेऊ शकतात. परंतु तेव्हा इंदरकुमारने त्यांचा सल्ला नाकारला होता. कारण ह्या चित्रपटात जो कॅरॅक्टर होता तो प्रॅन्क्स करायचा. हा कॅरॅक्टर अमीरसोबत खूप जुळत होता. ह्यामुळे ह्या चित्रपटात इंदरकुमार ह्यांनी अनिल कपूरला घेतले नाही. सोबत त्यांनी अनिल कपूरला अगोदरच ‘बेटा’ चित्रपटासाठी साईन केले होते, म्हणून ह्या चित्रपटासाठी अनिल कपूरला साइन करणे त्यांना ठीक वाटले नाही. मित्रांनो तुम्हांला ज्युबली स्टार राजेंद्र कुमार तर लक्षात असतीलच. त्यांचा मुलगा आला होता बॉलिवूडमध्ये ज्याचे नाव होते कुमार गौरव. ज्याने आपल्या करियरची सुरुवात १९८१ मध्ये आलेल्या ‘लव्हस्टोरी’ चित्रपटाने केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता. परंतु ह्या चित्रपटानंतर कुमार गौरव आपल्या चित्रपट करियर मध्ये काहीच कमाल दाखवू शकला नाही. आणि ९० चे दशक येईपर्यंत त्याचे करियर जवळजवळ संपले होते.जर ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटानंतर कुमार गौरवला ओळखलं जात असेल तर ते ‘नाम’ चित्रपटातील त्याच्या साईड रोलच्या भूमिकेसाठी. हि ती वेळ होती जेव्हा कुमार गौरवचे करियर संपले होते आणि आमिर खानच्या करियरला सुरुवात झाली होती. त्यावेळी कुमार गौरवचा चेहरा आमिर खानच्या चेहऱ्याशी खूपच मिळताजुळता होता. हेच कारण होते जेव्हा आमिर खानचा वाईट काळ आला होता, जेव्हा त्याचे चित्रपट फ्लॉप होत होते तेव्हा बॉलिवूडच्या अनेकांनी इंदरकुमार ह्यांना हे सुद्धा सांगितले कि, “आमिर खान तर कुमार गौरवची सेकंड कॉपी वाटतोय. तुम्ही ह्याला चित्रपटात का घेत आहेत.” परंतु इंदरकुमार ह्यांनी ह्या सर्वांची पर्वा न करता आमिर खान सोबतच हा चित्रपट शूट केला. आणि जेव्हा ‘दिल’ हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याचा रिझल्ट सर्वांना माहीतच आहे कि हा चित्रपट किती मोठा हिट ठरला होता ते. ह्याउलट हा चित्रपट हिट ठरल्यानंतर आमिर खानचा ‘दिवाना मुझ सा नही’ हा चित्रपट अगोदरच बनून झालेला होता, त्या चित्रपटालासुद्धा डिस्ट्रिब्युटर मिळाला आणि हा चित्रपट त्यानंतर रिलीज झाला. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगितले कि इंडिस्ट्रीच्या सुपरस्टार अभिनेत्याला सुद्दा कसे एकेकाळी कोण्या फ्लॉप ऍक्टरची सेकंड कॉपी म्हटले गेले होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *