इच्छा नसताना सलमान खानने जो चित्रपट केला होता त्याच चित्रपटाने त्याचे नशीब बदलले

सलमान खान बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आला तेव्हा त्याचा पहिलाच चित्रपट सुपर डुपर हिट झाला. इतकंच नाही तर ह्या चित्रपटाने अनेक जुने रेकॉर्ड तोडले. ह्यानंतर सलमानचे ५ चित्रपट रिलीज झाले. जे एकामागून एक हिट झाले होते. परंतु इतके सर्व हिट चित्रपट दिल्यानंतर सलमान खानला अशी सुद्धा वेळ बघावी लागली जेव्हा त्याचे ६ चित्रपट एकामागून एक फ्लॉप झाले. दोनच वर्षात जो हिरो सुपरस्टार होता तो पुन्हा झिरो बनला. त्याच्या हातात एकही चित्रपट नव्हता. मजबुरी मध्ये येऊन सलमानला एक चित्रपट साईन करावा लागला, जो चित्रपट अगोदरच एका मोठ्या अभिनेत्याने सोडला होता. तर आजच्या ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत का सलमानने मजबुरी मध्ये हा चित्रपट साईन केला, का त्याला मजबूर व्हावे लागले, आणि ह्या चित्रपटाने कसे काय त्याचे करियर बदलून टाकले.

सलमान जेव्हा बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटात आला होता तेव्हा मुख्य अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता ‘मैने प्यार किया’. ह्या अगोदर त्याने ‘बीवी हो तो ऐसी’ मध्ये काम केले होते पण एका सहायक अभिनेता म्हणून. मुख्य अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता ‘मैने प्यार किया’. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट राहिला. ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ह्यानंतर सलमानचे अजून काही चित्रपट आले. जसे कि ‘बागी’, ‘सनम बेवफा’, ‘कुर्बान’, पत्थर के फुल’ आणि ‘साजन’. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. ह्यानंतर एक असा सुद्धा काळ आला कि सलमानकडे चित्रपट तर होते, परंतु त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल करू शकत नव्हते. हे चित्रपट होते ‘सूर्यवंशी’, ‘निश्चय’, ‘जागृती’, ‘चांद का तुकडा’, ‘एक लडका एक लडकी’ आणि ‘दिल तेरा आशिक’. सलमानचे मागील चित्रपट जितके मोठे हिट होते, हे चित्रपट तितकेच मोठे फ्लॉप झाले. सलमानचे करियर संकटात आले होते. सलमानला चित्रपट मिळत नव्हते आणि मार्केट मधून त्याचे नाव जात चालले होते. सलमानचे चित्रपट आता चालत नाहीत म्हणून त्याला चित्रपट ऑफर होणे सुद्धा खूप कमी झाले होते.ह्याच दरम्यान दिग्दर्शक सूरज बडजात्या त्याकाळी एका चित्रपटाची कथा लिहीत होते. परंतु हि कथा ते सलमानसाठी नाही तर आमिर खानला विचारात धरून लिहीत होते. हा चित्रपट होता ‘हम आपके है कौन’. ह्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून माधुरीला फायनल केले होते. माधुरीचा ह्याअगोदरचा आमिर सोबतच चित्रपट ‘दिल’ हा सुपरडुपर हिट होता. ह्यामुळे माधुरी सोबत आमिर खानची जोडीच सुरज बडजात्याला ‘हम आपके है कौन’ चित्रपटासाठी हवी होती. त्यांनी ह्या चित्रपटाची कथा आमिर खान समोर ऐकवली. आमिरने चित्रपटाची संपूर्ण कथा ऐकली, परंतु त्याला ‘प्रेम’ चे कॅरॅक्टर इतके दमदार नाही वाटले. त्यामुळे त्याने ह्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. आमिरने चित्रपट सोडला होता आणि माधुरीला मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपटासाठी फायनल केले होते. ह्यानंतर सुरज बडजात्या ह्यांच्या डोक्यात जो अभिनेता आला तो म्हणजे सलमान खान. सलमान खान आणि माधुरीचा अगोदरचा चित्रपट ‘दिल तेरा आशिक’ सुपर फ्लॉप होता. परंतु ‘साजन’ चित्रपटात ह्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली होती म्हणून सुरज बडजात्यांनी दोघांना ह्या चित्रपटात घेतले.सुरज बडजात्या जेव्हा हा चित्रपट सलमानकडे घेऊन गेले तेव्हा सलमानला हे माहिती होतं कि आमिरने हा चित्रपट रिजेक्ट केला आहे ते. सलमानला हे हि माहिती होतं कि माधुरीला त्याच्यापेक्षा जास्त फी दिली जात आहे. तर दुसरीकडे सलमानचे काही चित्रपट बनवून तयार होते परंतु त्यांना कोणी डिस्ट्रिब्युटर विकत घेत नव्हता, कारण सलमानचे मार्केट घसरले होते. ह्या दबावामुळे आपले करियर वाचवण्यासाठी सलमानकडे दुसरा कोणता मार्ग नव्हता. त्यामुळे त्याने ह्या चित्रपटासाठी मनात नसताना सुद्धा होकार दिला. परंतु ‘हम आपके है कौन’ चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो ब्लॉकब्लास्टर ठरला. तो बॉलिवूडचा त्यावेळचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. ह्या चित्रपटाने त्याकाळी १३४ कोटींची कमाई केली होती. जे आताच्या काळात जवळजवळ ७०० कोटींच्या बरोबरीचे आहेत. ह्या चित्रपटाने सलमान आणि माधुरीचे करियरचा बदलून टाकले. संपूर्ण इंडस्ट्री त्यांना एका वेगळ्याच नजरेने पाहू लागली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर, ह्या चित्रपटाचे रिझल्ट्स पाहिल्यानंतर आमिर खानला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याला कळून चुकले कि त्याने हा चित्रपट सोडायला नको होता. इतकंच नाही तेव्हापर्यंत आमिर खानच्या कोणत्याही चित्रपटाने ह्या चित्रपटाच्या अर्धा सुद्धा बिझनेस केला नव्हता. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगितले कि सलमान खानने मजबुरी मध्ये जो चित्रपट साईन केला होता त्याच चित्रपटाने त्याच्या चित्रपट करियरच बदलून टाकले. तुम्हांला आजचा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *