स्वतःचा चेहरा हिरोसाठी योग्य नाही म्हणून अश्याप्रकारे मुलाला बनवले स्टार

सन १९५७ सालातील ही गोष्ट आहे. वीरू देवगण वय वर्षे १४, अमृतसर मधील आपल्या घरातून पळून मुंबईला येणाऱ्या फ्रंटियर मेल मध्ये चढले. त्यांच्या सोबत त्यांचे काही मित्र होते, रेल्वेचे तिकीट न घेताच सगळे प्रवास करीत होते. त्यांना तिकीट मास्तरांनी पकडले आणि जेलची हवा खावी लागली. आठ दिवसानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा मुंबई शहर आणि भुकेने व्याकुळ झालेले. त्यांचे काही मित्र अमृतसरला परत गेले. पण वीरू देवगणने हार मानली नाही. ते टॅक्सी साफ करायचे नंतर सुताराचे काम करायला शिकले. त्यातून वेळ मिळाला की, स्टुडिओ मधे फेरी मारायचे. पण त्यांनी हिम्मत हारली नाही, त्यांना अभिनेता बनायचे होते. पण नंतर त्यांना समजून आले की, हिंदी चित्रपट सृष्टीत जे स्टार बनलेले आहेत, त्यांचे चॉकलेट हिरो प्रकारचे चेहरे आणि अभिनय यामुळे ते मोठे कलाकार बनले. त्यांना कळले यांच्या पुढे आपले काही पान हलेल असं वाटत नाही. त्यामुळे आपल्याला चित्रपटात काम करायचा चान्सच मिळणार नाही असा त्यांना विश्वास बसला.

विरुंनी स्वतः सांगितले, ” जेव्हा मी माझा चेहरा आरश्यात पहिला तेव्हा कळले की, इतर स्ट्रगल करणाऱ्यांच्या तुलनेत आपण काहीच नाही आहोत. पण त्यांनी एक निश्चय केला, माझा पहिला मुलगा होईल त्याला मी नक्कीच अभिनेता बनवेन.” विरूंनी आपला मुलगा अजयला कमी वयातच फिल्म मेकिंग, अभिनय यांच्याशी निगडित ठेवले. तेव्हा पासून ते हे सर्व अजयच्या हातून करवून घ्यायचे. अजयला महाविद्यालयीन काळात त्यांनी नृत्याचे क्लास लावले, घरात जिम बनवली, उर्दू भाषा शिकण्यासाठी क्लास लावला. घोडेस्वारी करायला शिकवले. नंतर अजयला त्यांच्या चित्रपटात ऍक्शन टीमचा भाग बनवले. त्यांनी अजयला सेटची उभारणी कशी करतात ते शिकवले. त्यामुळे अजय चांगला फिल्ममेकर घडू शकला.अजय तेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता आणि त्याच काळात शेखर कपूरचा चित्रपट ‘दुश्मनी’ साठी त्याला मदत करायच ठरवलेे. तोपर्यंत अजयने चित्रपटात येण्याचा निर्णय घेतला नव्हता. एके संध्याकाळी त्याच्या घरी दिग्दर्शक संदेश(कुकू) कोहली त्यांच्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करीत बसले होते. तेवढ्यात अजय आला, विरुने विचारले संदेश ‘फूल और काटे’ नावाचा एक चित्रपट करतोय आणि त्यात तुला अभिनेता म्हणून घ्यायचा त्याचा विचार आहे. त्यावर अजयने एकदम प्रतिक्रिया दिली, “मी अजून 18 वर्षाचा आहे आणि माझी लाईफ एन्जॉय करतोय”. अजय ‘नाही’ म्हणून तिथून निघून गेला, ही ऑक्टोबर १९९० ची गोष्ट होती. पुढच्याच महिन्यात नोव्हेंबर मधे तो चित्रपटाची शूटिंग करीत होता. यात विरूंनी करून घेतलेली तयारी आणि त्यांचा मुलगा असण्याचा जोश अजयमध्ये दिसुन येत होता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *