या अभिनेत्यामुळे माझं करिअर घडलं, लठ्ठपणामुळे मला कोणी नाटकातही मुख्य भूमिका देत नव्हते

सोनाक्षी सिन्हाच्या करियरला मागील काही दिवसात चढ उतार लागला आहे. परंतु तिचा काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मिशन मंगल’ च्या यशाने ती पुन्हा यशाच्या वाटेवर आली असून या चित्रपटाच्या यशाने तिचे करियर सरळ मार्गावर आले आहे. या यशाबद्दल मीडिया समोर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. मिशन मंगल चित्रपट हिट झाल्यामुळे सोनाक्षी सिन्हाने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, “मला खूप आनंद होत आहे, कारण हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. खास करून चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी माझ्या टीम बरोबर खूप छान अनुभव आले. यावेळी मला खूप आनंद झाला. मी त्या सर्व वैज्ञानिकांना नमस्कार करते ज्यांनी हे खरच करून दाखवले.” अभिनेत्री पुढे म्हणाली कि, “खरं सांगू तर, मला माहिती होते हा चित्रपट नक्कीच चांगली कामगिरी करेल आणि यश मिळवेल. भारताच्या मोठ्या विक्रमी यशावर हा चित्रपट आधारित होता. मला वाटते जर तुम्ही छान विषयावर एखादा सुंदर सिनेमा बनवला आणि जर तो देशभक्तीवर आधारित असेल तर खूपच छान. अगदी सोन्याहून पिवळे. असे चित्रपट नेहमी यशाचे शिखर गाठतात.

सोनालीने तिच्या आत्ता पर्यंतच्या वाटचाली बद्दल सांगितले. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार पाहायला मिळतात. एक कलाकारच नाही तर साद्या रिक्षावल्याच्या जीवनातही चढ उतार बघायला मिळतात. हे असे असणे सहाजिकच आहे. या अशा घटनांमुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. माझ्या मागे लोकं काय बोलतात याचा मला कडीमात्रही फरक पडत नाही. ते काहीही बोलू देत कारण मी आजही तिथेच उभी आहे जिथे मी अगोदर होते आणि ती लोकंही अगोदर जिथे होती तिथेच आहेत. माझ्या जवळ एवढं सामर्थ्य तर नक्कीच आहे कि नकारात्मक गोष्टींना माझ्या जवळपासही झळकू देत नाही. सगळ्यात गरजेचे म्हणजेच आपण आपल्या कामात पारंगत असले पाहिजे. त्याच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि सकारात्मक राहिले पाहिजे. पाठी न बघता सतत पुढे जात राहावे. कदाचित मला माझ्या काही चित्रपटात यश मिळाले नसेल, पण याचा अर्थ असा तर नक्कीच होत नाही कि, मला चित्रपट निर्मात्याने किंवा दिग्दर्शकांने चित्रपट देणे बंद केले. खरं सांगू तर मागील दिवसात मी एवढी व्यस्त होते, जेवढी याआधी कधीच नव्हते. यावर्षी माझ सलगे 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.तिच्या येणाऱ्या ‘दबंग3′ चित्रपटाविषयी बोलताना सोनाक्षीने खूप काही सांगितले. तिने सिनेमातील तिच्या भूमिके विषयी बोलताना ती म्हणाली,’ ‘रज्जो ची भूमिका माझ्यासाठी विशेष आहे. दबंग मधे काम करताना असे वाटते की मी माझ्या घरी पुन्हा आले. जेव्हा जेव्हा मी दबंग सिरीज मधे काम करते, तेव्हा मला असे वाटते की, मी जेथून सुरुवात केली, तेथेच पुन्हा आले आहे. आज मी जे काही आहे ती ‘दबंग’ चित्रपट, सलमान खान, अरबाज खान आणि त्यांच्या संपुर्ण कुटुंबामुळे आहे. त्यांनी मला रज्जो बनवले त्यानंतर मी पुन्हा पाठी वळून पहिले नाही. मी खूप खुश होते जेव्हा ह्या चित्रपटाच्या जुन्या टीम बरोबर भेटते. काही जुनी लोकं आहेत ती या सिरीज सोबत सुरुवातीच पासून आहेत.सोनाक्षी सिन्हाने सांगितले कि आज ती करियरच्या ज्या शिखरावर आहे त्याचे सर्व श्रेय ती खान परिवार म्हणजेच सलमान खान, अरबाज खान आणि त्याच्या कुटुंबाला देऊ इच्छिते. तिने सांगितले कि अनेकदा माझी खिचडी झाली आहे. ह्याचे कारण माझे लट्ठपणा होते. माझे वजन जवळजवळ ९५ किलोपर्यंत झाले होते. वजन कमी करण्यासाठी मी खूप काही कामे केली. अनेक खेळांत सहभागी झाली होते. वजन वाढल्यामुळे मुलं मला अनेक नावाने चिडवत होते. ते मला शाळेच्या नाटकांत मुख्य भूमिका करू देत नव्हते. ते लोकं नेहमी मला बाजूला उभं करायचे किंवा माझ्याकढून लिहून घेत असे. परंतु सोनाक्षीची चित्रपटसृष्टीत दमदार एंट्री झाली ती सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटामुळे. आणि ह्या चित्रपटात तिला ‘रज्जो’ची भूमिका मिळाली होती. रज्जो ची भूमिका आणि तिचे डायलॉग्स खूप लोकप्रिय झाले होते. त्यामुळे आजही सोनाक्षी ह्या चित्रपटाचे आणि मुख्य म्हणजे सलमान खानचे आभार मानते. जर सलमान खानने तिला हा चित्रपट दिला नसता तर कदाचित सोनाक्षी इतकी लोकप्रिय झाली नसती. म्हणून ती म्हणते मी आज जी काहीही आहे ती फक्त सलमान मुळेच.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *