अक्षकडे बोट दाखून जेव्हा वीरू अजय देवगनला म्हणाले, ““तो मुलगा करतो तसे कर तरच स्टार बनशील”

अजय देवगणचे वडील वीरू देवगण बॉलिवूडचे खूप मोठे फायटिंग मास्तर आहेत. विरु देवगण ह्यांनी बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या चित्रपटांसाठी स्टंट दिग्दर्शन केले आहे. ‘इश्क’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘मिस्टर इंडिया’, ‘विजयपथ’, ‘जान’ ह्यासारख्या अनेक चित्रपटांसाठी ते ऍक्शन दिग्दर्शक राहिले आहेत. त्यांनी स्वतःहून एक चित्रपट दिग्दर्शित केला होता, त्या चित्रपटाचे नाव आहे ‘हिंदुस्थान कि कसम’. ज्या चित्रपटात अजय देवगणचा डबल रोल होता. वीरू देवगण ह्यांचा आज एक किस्सा आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. वीरू देवगण ह्यांनी पहिल्यांदा अक्षय कुमारला पाहिलं होतं तेव्हा त्यांनी अजय देवगणला सांगितले होते तू ह्याच्यासारखं कर. तरच स्टार बनेल. तर आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत केव्हा वीरू देवगण ह्यांनी अक्षय कुमारला पाहिलं, का त्यांनी अक्षयला आपल्याजवळ बोलावलं आणि कसं अजयला त्याच्यासारखं कॉपी करायला सांगितलं.

हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये चित्रपट केले नव्हते परंतु चित्रपटात काम करण्यासाठी तो स्ट्रगल करत होता. त्याकाळी अक्षय कुमार मार्शल आर्टच्या सरावासाठी जुहू बीचवर यायचा. त्यात तो स्टंट आणि ऍक्शनचा नियमित सराव करत असे. त्याच जुहू बीचवर वीरू देवगण स्टंटचा सराव करण्यासाठी आपल्या टीम सोबत येत असत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अजय देवगण सुद्धा येत असे. वीरू देवगण एक स्टंट डायरेक्टर असल्यामुळे लोकं त्यांना जास्त ओळखत नव्हते, आणि त्यावेळी अजय देवगणने सुद्धा बॉलिवूडमध्ये पर्दापण केले नव्हते. हेच कारण होते कि ते तिथे शांतपणे सराव करायचे आणि लोकं सुद्धा त्यांना त्रास देत नसत. अक्षय कुमार तेथे रोज सरावाला येत असे आणि वीरू देवगण ह्यांचा सुद्धा तिथे रोजचाच शेड्युल होता. दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते. प्रत्येक दिवशी वीरू देवगण अक्षय कुमारला स्टंटचा सराव करताना पाहत असे. त्याच्या स्टंटच्या पोजिशन्स पाहून वीरू देवगण आतल्या आत इम्प्रेस झाले. दोन चार दिवस त्यांनी अक्षयला नोटीस केली. त्यानंतर त्यांनी एके दिवशी अक्षयला आपल्याजवळ बोलावले. वीरू देवगण ह्यांनी जेव्हा अक्षयला बोलावले तेव्हा अक्षय त्यांच्याजवळ गेला. त्यानंतर वीरू देवगण ह्यांनी अक्षय कुमारला एक ठराविक स्टंटची पोजिशन करायला सांगितली. अक्षय कुमारने त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्टंटची ती पोजिशन जशीच्या तशी करून दाखवली.तेव्हा वीरू देवगण ह्यांनी जवळच उभ्या असलेल्या अजय देवगणला सांगितले, ” हे बघ, हे असं करतात. तू सुद्धा असंच कर. तरच ऍक्शन चित्रपटात स्टार बनशील” नंतर त्या दिवसा नंतर वीरू देवगण ह्यांनी अक्षय कुमारला सांगितले कि तू सुद्धा रोज आमच्यासोबत येऊन सराव करत जा. पुढच्याच दिवसापासून अक्षयने वीरू देवगण ह्यांच्या टीम सोबत सराव करायला सुरुवात केली. अजय देवगण सुद्धा ह्या टीमचा भाग होता. हि आठवण अक्षय कुमारने एका मुलाखतीत सांगितली. अक्षय कुमारने वीरू देवगण ह्यांच्याकडून खूप काही शिकला आणि त्यांच्या टीमला खूप काही शिकवले सुद्धा. तिथूनच हा एक्शनचा प्रवास सुरु झाला. अक्षय कुमार आणि अजय देवगण दोघांनीही बॉलिवूडमध्ये जवळजवळ सोबतच एंट्री केली. अजय देवगण जो विरु देवगण ह्यांचा मुलगा आहे आणि अक्षय कुमार जो वीरू देवगण ह्यांचा शिष्य आहे आजच्या तारखेला हे दोघेही सुपरस्टार आहेत आणि आपल्या अफलातून ऍक्शनसाठी ओळखले जातात. उलट अक्षय कुमार आणि अजय देवगण ह्यांनी एकत्र काही चित्रपटात काम सुद्धा केले आहे. जसे कि ‘इन्सान’, ‘खाकी’, ‘सुहाग’. ह्यापैकी ‘सुहाग’ आणि ‘खाकी’ चित्रपट हिट झाले होते. आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगितले कि कश्याप्रकारे वीरू देवगण ह्यांनी अजयला सांगतिले कि तू अक्षय सारखं स्टंट करत जा. अक्षय कुमारने शेअर केलेल्या ह्या आठवणीचा व्हिडीओ आम्ही खाली दिलेला आहे, तो नक्की पहा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *