या ७ क्रिकेटर्सनी केले केले आहे चित्रपटांमध्ये काम, एकाने तर दिलाय वर्ल्डकप जिंकून

१. सलीम दुराणी (१९६०-७३)- १९६१साली अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते डावखुरे फिरकी गोलंदाज तसेच ते डावखुऱ्या हातांनी फलंदाजी करायचे. प्रेक्षकांमध्ये दुराणी लोकप्रिय होते कारण- मैदानाच्या ज्या भागात किंवा कोपऱ्यात चाहते सिक्सरची डिमांड करायचे. तेथेच दुराणी चेंडू भिरकावून देत. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर दुराणी यांनी सिनेस्रुष्टीत धमाकेदार एंट्री केली. चेतना, मान जाईए आणि दुसरा बाप यासारखे सिनेमे दिग्दर्शित करणार्या बी. आर. इशारा यांच्या चरित्र सिनेमाद्वारे डेब्यु केले. या सिनेमात त्यांनी दारुड्या मुलाचे पात्र रंगवले होते.

२. संदीप पाटील (१९८०-८६)- टी-२० क्रिकेटचा उदय होण्याच्या आधी जवळपास २५ वर्षांपूर्वी हे खेळाडू तुफानी शैलीतच फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध होते. सिक्सेची गोष्ट तर विचारुच नका. गगनचुंबी षटकार मारण्याची हातोटी असलेल्या पाटील यांच्याबाबतीत अनेक दंतकथा होत्या. त्यातलीच एक म्हणजे- एकदा पारशी जिमखान्याकडुन खेळताना त्यांनी मारलेला एवढा लांब सिक्स हाणला म्हणे की बॉल थेट अरबी समुद्रातच जाऊन पडला.ही गोष्ट किती खरी, किती खोटी याबाबत कुठलेही अधिकृत वृत्त उपलब्ध नाही. १९८३ वल्डकप नंतर खेळाडूंना दैवत्वच प्राप्त होऊ लागले. याच काळात संदीप पाटील यांना कभी अजनबी थे सिनेमाची ऑफर आली होती. या फिल्ममुळे त्या वेळी असणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळण्यास नकार दिला. या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. एका क्रिकेटरचीच भूमिका त्यांनी केली होती.३. सय्यद किरमाणी (१९७६-८६) – असा विकेटकीपर ज्याला ८३ वल्डकपमध्ये सर्वोत्कृष्ट विकेटकीपर या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ते लोअर ऑर्डर मधील एक भरवशाचे फलंदाज होते. फलंदाज वा गोलंदाजांप्रमाणे यांच्या विकेटकीपिंगमध्ये लय हरवायची. १९७९ सालच्या पाकिस्तान आणि विंडीज विरूद्ध विकेटकीपर म्हणून केलेल्या खराब कामगिरीमुळे त्यांना १९७९ सालच्या वल्डकप संघातून वगळले होते. १९८१ ला इंग्लंडविरूद्ध एकही बाय रन जाऊ दिला नाही. 83 वर्ल्डकप नंतर आलेल्या संदीप पाटील यांच्या कभी अजनबी थे या सिनेमात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली. या सिनेमात त्यांनी अंडरवर्ल्ड गँगस्टरचा रोल केला होता.४. सलील अंकोला – ८९ सालच्या पाकिस्तान दौऱ्यात सचिन तेंडुलकर सोबत या फास्ट बॉलर ने सुद्धा पदार्पण केले होते. सलीलला सुद्धा बहुतांशी बॉलर प्रमाणे दुखापतींनी ग्रासले ज्यामुळे तो भारतीय संघाचा कायमस्वरूपी सदस्य बनू शकला नाही. 1996 च्या वर्ल्ड कप संघाचा तो हिस्सा होता परंतु त्याला अवघा एक सामना खेळण्याची संधी मिळाली. 90 च्या दशकातच सलीलला बोन ट्यूमर झाला होता त्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने आपला मोर्चा सिनेसृष्टीत वळवला क्रिकेटपटू असलेल्या चांगल्या अभिनेत्यांमध्ये सलिलची गणना होते. त्याने कुरुक्षेत्र पिता आणि चुरा लिया है तुमने सारख्या सिनेमांत काम केले याशिवाय चाहत और नफरत (१९९९) श्श्श्श… कोई है (२००२) बिग बॉस(२००६) खतरो के खिलाडी(२००७) सावित्री (२०१३) आणि कर्मफल दाता शनी(२०१६) यासारख्या मालिकांमधून काम केले आहे.५.विनोद कांबळी ( १९९१-२०००) – सचिन तेंडुलकरच्या काळातच किंबहुना त्याच्यासोबतच आपली कारकीर्द घडवणाऱ्या विनोद कांबळीने आपल्या रणजी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. तीन टेस्टमध्ये सलग तीन सेंचुरी आणि त्यानंतर वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी टेस्ट क्रिकेट मधून घेतलेली निवृत्ती. वन-डे क्रिकेटमध्ये अजूनही ह कांबळीची चर्चा होती. 1996 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे कांबळीला अश्रु अनावर झाले. या वर्ल्डकप नंतर कांबळीने एकूण 35 वनडे सामने खेळ याच काळात कांबळीला फारशी चमक दाखवता आली नाही. एवरेज सुद्धा खाली येत होता. 2002 मध्ये त्याने सिनेमात जाण्याचा मार्ग निवडला. संजय दत्त व सुनील शेट्टी सारखे मोठ्या अभिनेत्यांबरोबर अनर्थ नावाच्या सिनेमाने त्याने डेब्यू केले. या सिनेमात त्याने गँगस्टर च्या मित्राची भूमिका केली होती. त्यानंतर त्याने पल पल दिल के पास (२००९), कन्नड सिनेमा ‘बेट्टानगेरे’ (२०१५) मधुनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. टीव्हीवर मिस इंडिया नावाची सिरीयल तर केलीच याशिवाय 2009 साली आलेल्या बिग बॉस मध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.६. अजय जडेजा (१९९२-२०००) – उजव्या हाताने खेळणारा मधल्या फळीत खेळणाऱ्या या फलंदाजाने नव्वदच्या दशकात ‘फिनिशर’ म्हणून ओळख मिळवली होती. त्याकाळात चांगली फिल्डिंग पण करायचा. २००० साली मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्याच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. बंदी लागण्याच्या आधी शेवटच्या सामन्यात पेप्सी कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध ९३ धावा करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. २००३ लाबंदी उठली होती पण तो पर्यंत सेहवागसारख्या युवा खेळाडुंमुळे करीयर संपुष्टात आले होते. त्याचवर्षी त्याने ‘खेल’ सिनेमातून पदार्पण केले. या सिनेमात त्याच्याबरोबर सुनील शेट्टी आणि सेलिना जेटलीसुध्दा होते. २००९ साली विनोद कांबळी सोबत पल पल दिल के पास नावाच्या सिनेमात काम केले. तर छोट्या पडद्यावर कॉमेडी सर्कस,झलक दिखला जा यासारख्या रिएलिटी शोज मध्ये परीक्षकाची भुमिका बजावली.७. कपिल देव (१९७८-१९९४) – भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन या खेळाडूला इतिहास कधीच विसरू शकणार नाही. ८३ वर्ल्ड कप मध्ये झिंबाब्वे विरुद्ध खेळलेली १७५ धावांची खेळी वन-डे क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट खेळी म्हणून गणली जाते. ज्यावेळी ते टेस्टमधून निवृत्त झाले त्यावेळी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी होते. तो रेकॉर्ड अखेरीस 2000 साली कोर्टनी वॉल्श यांनी मोडला. 1994 साली कपिल देव पहिल्यांदा सिनेमात दिसले. सिनेमाचं नाव होतं दिल्लगी… ये दिल्लगी. खरंतर या सिनेमात त्यांचा खूप असा मोठा रोल नव्हता. त्या सिनेमात त्यांच्यावर एक गाणे चित्रीत केले आहे. ह्या लिस्टमध्ये कपिल यांना स्थान मिळाले आहे कारण, काही ठरावीक अंतरानंतर स्वतःच्या कॅरेक्टर मध्ये बॉलीवूड सिनेमात दिसले आहेत. दिल्लगी… ये दिल्लगी नंतर, इक्बाल (2005), चेन कुली की मेन कुली(2007) व 2004 साली आलेल्या सलमान खान अक्षय कुमार यांचा अभिनय असलेल्या मुझसे शादी करोगी या सारख्या चित्रपटात देखील दिसले आहेत. कपिल यांच्यावर ’83 नावाचा सिनेमा येतोय त्यात त्यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंग करत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *