Home / कलाकार / हनी सिंग आता कसा दिसतो पहा, थक्क व्हाल

हनी सिंग आता कसा दिसतो पहा, थक्क व्हाल

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हनी सिंग आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. परंतु ह्यावेळी त्याच्या गाण्यांपेक्षा तो जास्त त्याच्या फॅशन साठी चर्चेत आहे. ह्यावेळी हनी सिंग आपल्या फोटोमुळे चर्चेत आला आहे. नुकतेच हनी सिंग आयफा अवॉर्ड नाईटच्या इव्हेंटमध्ये दिसला. या कार्यक्रमातून हनी सिंगचे छायाचित्रे समोर आल्यावर लोकं चकित झालेत. वाढलेले वजन आणि लांब केसांमध्ये हनी सिंगला पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की, हि व्यक्ती हनी सिंग आहे. या कार्यक्रमादरम्यान सिंगर हनी सिंह ऍनिमल प्रिंट जॅकेट आणि ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. हनी सिंगची ही छायाचित्रे वायरल भयानी ह्या पेजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. या चित्रांवर आलेल्या कमेंट्स पाहून हनी सिंगचे चाहते अजूनच आश्चर्यचकित झालेत.

हनी सिंग याला या कार्यक्रमातच नव्हे तर यापूर्वी विमानतळावरही पाहिले गेले होते. विमानतळावरील फोटोंमध्ये हनी सिंगला पाहून लोकांना विश्वास बसत नव्हता. हनी सिंगला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी आयफा पुरस्कार मिळाला आहे. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाच्या गाण्यांसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. यो यो हनी सिंगने आयफा अवार्ड जिंकल्यावर सांगितले कि, “मी गाण्यांना देशी रंग देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यासाठी मी ढोल ताश्यांचा वापर केला आणि मी खूप खुश आहे कि दर्शकांना माझे हे गाणं खूप आवडलं. मी माझ्या ह्या अवार्ड साठी माझ्या आई वडील आणि मित्रांचा खूप आभारी आहे.” सुपरस्टार गायक ने ‘सोनू के टिटू कि स्वीटी’ अल्बम सोबत प्रत्येकाचे मनं जिंकली. यो यो हनी सिंगच्या ‘दिल चोरी’ ह्या आपल्या गाण्याला ४५.७ कोटी व्युज तर ‘छोटे पेग’ ह्या गाण्याला १६ कोटी व्युज मिळाले आहे.यावेळी हनी सिंगकडे पाहताना एका चाहत्याने लिहिले, ‘हे यो यो आहेत ना? ओळखायलाच नाही आले. काय अवस्था झाली आहे तुमची?’ तर दुसर्याने हनी सिंग यांना विजय मल्ल्या असल्याचे सांगितले. विमानतळावर हनी सिंग यांना पाहून एका यूजरने लिहिले ‘वाइन प्यायल्यानंतर काय परिस्थिती आहे, मद्याचा परिणाम या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो’. त्याचवेळी कोणीतरी हनी सिंगला केस कापण्याचा सल्लाही दिला. हनी सिंगबद्दल सांगायचे तर एकावेळी त्याची अशी क्रेज होती की, त्याची गाणी सुपर-डुपर हिट तर होत होतीच पण लोकंही त्याच्या लूकची कॉपी करत असत. बर्याच दिवसांपासून तब्येत बिघडल्यानंतर आता हनी सिंग मैदानात परतला आहे.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.