‘दे धक्का’ चित्रपटातली सायली झाली आहे मोठी पहा आता कशी दिसते

२००८ साली आलेला ‘दे धक्का’ चित्रपट तुमच्या लक्षात असेलच. ह्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर ह्यांच्या मुख्य भूमिका होत्या. सिद्धार्थ जाधव ह्याच्या अतरंगी कॉमेडीला मकरंद अनापसुरे ह्यांच्या गावरान विनोदाचा तडका लाभल्यामुळे हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. ह्या कलाकारांसोबत चित्रपटात दोन मुख्य बालकारकरांच्या भूमिका होत्या. एक म्हणजे सक्षम कुलकर्णी आणि दुसरी गौरी वैद्य. ह्या दोघांनीही बालकलाकार म्हणून चित्रपटात फार सुरेख काम केले होते. हा चित्रपट २००८ साली आला होता, म्हणजेच चित्रपटाला ११ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. साहजिकच चित्रपटातील कलाकारही आता वयाने मोठे झाले आहेत, त्यांचा लूकसुद्धा चेंज झाला आहे. आज आपण ह्याच चित्रपटातील गौरी वैद्य हिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

२००३ साली आलेल्या ‘हेडा होडा’ ह्या हिंदी चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले होते. त्यानंतर तिचा दुसरा चित्रपट म्हणजे ‘दे धक्का’. हा चित्रपट २००८ साली आला होता. ‘दे धक्का’ चित्रपटाची कथा ज्या मुलीच्या डान्स कॉम्पिटिशन भोवती फिरत होती, तिच्याच ‘उगवली शुक्राची चांदणे’ हे गाणं लोकांना खूप आवडलं. ह्या गाण्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली होती. नंतर तिने २०१० साली आलेल्या ‘शिक्षणाच्या आयचा घो’ चित्रपटात एक महत्वाची भूमिका निभावली. ह्या चित्रपटात भरत जाधव आणि सक्षम कुलकर्णी ह्यांच्या मुख्य भूमिका होत्या. भरत जाधवने तिच्या वडिलांची तर सक्षम ह्या चित्रपटात सुद्धा तिच्या भावाची भूमिका निभावली होती. त्यानंतर २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ ह्या रिऍलिटी शो मध्ये तिने सक्षम सोबत भाग घेतला होता. २०१५ साली तिने आवाहन चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. ह्यात तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका केली होती. तिच्यासोबत सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मिरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका होत्या. परंतु इतकं असूनही ती काही मोजक्याच चित्रपटात दिसली. नंतर तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. ती चित्रपटसृष्टीपासून दुरावत गेली.गौरी आता २४ वर्षांची झाली आहे. तिने मुंबई येथील ‘डी. जी. रुपारेल’ कॉलेज मधून शिक्षण घेतल्यानंतर ‘वॅटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेकट्रोनिक इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी’ मधून डिग्री पूर्ण केली. आपलं शिक्षण पूर्ण करत असताना कुठेतरी एक चांगली कलाकार मराठी चित्रपटसृष्टीपासून दुरावत आहे असे जाणवत होते. गौरीला अभिनयासोबतच नृत्याची आवड आहे. दे धक्का चित्रपटात तिने ‘उगवली शुक्राची चांदणे’ गाण्यावर फार सुंदर नृत्य केले होते. आता पुढील वर्षी ३ जानेवारीला ‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे. तर ह्या चित्रपटात गौरीची भूमिका आहे कि नाही हे आपल्याला लवकरच कळेल. परंतु इतकं मात्र नक्की आहे कि मराठी चित्रपटरसिक ह्या गुणी अभिनेत्रीला खूप मिस करत आहेत. पाहूया आता ती पुन्हा एकदा कधी चित्रपटसृष्टीकडे परतते ते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *