अमिताभ बच्चनला जमलं नाही तो राजेश खन्नाचा रेकॉर्ड अक्षय कुमार तोडणार

चित्रपट विश्वात नावाजलेला कलाकार अक्षय कुमार हा यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. अक्षयच्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटाला बॉक्सऑफिस वर लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ह्यावर्षी तिसरे स्थान पटकावले आहे. या चित्रपटाने शाहिद कपूर चा ‘कबीर सिंह’ आणि सलमान खानचा ‘भारत’ ची बरोबरी करत बॉक्सऑफिस वर कित्येक नवीन विक्रम रचले आहेत. एक वेबसाईटच्या माहितीनुसार या चित्रपटाने रविवारी तब्बल १४ करोड रुपये एवढी कमाई केली. आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमार बद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी अक्षयला अमिताभ यांच्या पेक्षाही मोठा कलाकार ठरवू शकते. अक्षय तोडू शकतो राजेश खन्ना यांचा विक्रम. आज अक्षय कुमार बॉलीवुड मध्ये नावाजलेले चित्रपट देणारा एक सर्वात मोठा चेहरा बनला आहेत. त्याचे चित्रपट बॉक्सऑफिस वर येताच लोकप्रिय होण्याची हमी देतात. परंतु अक्षय आता एक असा विक्रम तोडण्याच्या अगदी जवळ आहे, जो एक काळचे सुप्रसिध्द अभिनेते राजेश खन्ना यांनी बनवला होता. जो आजवर अमिताभ बच्चन सारखा दिग्गज कलाकार ही तोडू शकला नाही. अक्षय कुमार सध्या ज्या पद्धतीने सलग हिट चित्रपट देऊन वर्षात किमान ३ ते ४ चित्रपट देत आहेत. हे अश्याच पद्धतीने चालू राहिले, तर अक्षय ,’राजेश खन्ना’ यांचा सलग १५ हिट चित्रपट देण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

तर होय, हा तोच विक्रम आहे जो एवढ्या वर्षांनंतर ही कोणीही तोडू शकले नाही. तोच विक्रम आता त्यांचे जावई अर्थात अक्षय कुमार तोडू शकतो. राजेश खन्ना यांनी आपल्या करियर च्या सुरुवातीच्या काळातच सलग १५ हिट चित्रपट देण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. हा विक्रम आजवर कोणीही तोडू शकला नाही, ही आश्चर्याची बाब आहे. परंतु आता असे वाटू लागले आहे की, अक्षय हा विक्रम तोडण्याच्या प्रगतीपथावर आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, वर्ष १९६९ ते १९७१ पर्यंत म्हणजेच सुमारे २ वर्षे राजेश खन्ना यांनी सुपर हिट चित्रपट विश्वाला दिले होते. हा विक्रम आजही अतूट आहे. ‘मिशन मंगल’ चित्रपटासमावेत अक्षय कुमारच्या नावावर सलग १० हिट चित्रपट करण्याचा विक्रम रचला गेला आहे. आता अक्षय ची वाटचाल राजेश खन्ना यांचा विक्रम तोडण्याच्या दिशेने होत असून, असे करण्यास अक्षय फक्त ६ चित्रपट दूर आहे.परंतु ज्या गतीने अक्षय लोकप्रिय चित्रपट देत आहे, हे पाहून असेच वाटते की अक्षय लवकरच बॉलीवूड विश्वातील सर्वात जास्त हिट चित्रपट करण्याचा विक्रमही लवकरचं आपल्या नावावर करेल. ही अभिमानाची गोष्ट आहे की, ७० च्या दशकात राजेश खन्ना हे यशाच्या शिखरावर असून त्यांना हिंदी चित्रपट विश्वातील पहिला सुपरस्टार मानले जाते. आपल्या अभिनयासोबतच ते युवतींमधेही फार लोकप्रिय होते. असे ही सांगितले जाते की, एकदा चाहत्यांनी त्यांच्या पांढऱ्या कारला चुंबन करून लिपस्टीकमूळे पूर्ण गुलाबी करून टाकले होते. असेही म्हटले जाते की, मुली त्यांच्यामागे एवढ्या प्रेमवेड्या होत्या की, त्यांना रक्ताने पत्र लिहून पाठवायच्या. आता हे पाहणे मनोरंजक असेल की, अक्षय कुमार आपल्या पुढील येणाऱ्या चित्रपटांद्वारे राजेश खन्ना यांचा विक्रम कश्याप्रकारे तोडतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, याच वर्षी अक्षय कुमारचे ‘हाउसफुल ४’ आणि ‘गुड न्यूज़’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *