१७ सिनेमात काम करून सुद्धा काम मागितल्यावर डेव्हिड धवनने गोविंदाला का काम दिले नाही, गोविंदाने स्वतः केला खुलासा

हॉलिवुड ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अवतार’ आणि त्याचे जुने सोबती डेव्हिड धवनच्या बद्दल दिलेल्या वक्तव्यामुळे हल्ली गोविंदा चर्चेत आहे. ‘अवतार’ बद्दल बोलताना गोविंदाने सांगितले, “ह्या सिनेमासाठी मला विचारण्यात आले होते, पण मी नाही म्हणालो.” तसेच दिग्दर्शकाला सिनेमाच नाव ‘अवतार’ त्यानेच सुचवले होते. पण ज्या बातमीमुळे बाजारात खळबळ उडवली आहे, ती म्हणजेच गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या आपसातील भांडणाची. एक प्रसिद्ध टीव्ही शो ‘आप की अदालत’ मध्ये बोलताना गोविंदाने ह्या गोष्टी उघड केल्या की, तो एवढी वर्षे डेव्हिड धवन सोबत बोलत का नव्हता? ज्या दिग्दर्शका बरोबर ज्याने 17 सिनेमे केले, त्यांच्या सोबत काम करताना का दिसत नाहीत?

गोविंदाने मुलाखत घेत असलेल्या रजत शर्माला सांगितले, “ते मला असे प्रश्न तेव्हा विचारू शकतील, जेव्हा त्यांचा मुलगा ( वरुण धवन ) त्यांच्या बरोबर 17 सिनेमे करेल. मला नाही वाटत कि, त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर 17 सिनेमे करेल. कारण तो डेव्हिड धवनचा मुलगा आहे. शिकलेला आहे, कोणाबरोबर 17 सिनेमे करण्याचा अर्थ आम्हाला माहिती नव्हता. मला तर तेव्हा संजय दत्तने सांगितले होते कि एक पंजाबी येतोय. त्यावेळी मी खूप पंजाबी लोकांना काम द्यायचो. नंतर डेव्हिड धवन आले आणि मला बरं वाटलं. मला वाटलं मी त्यांच्या सोबत खूप सारे हिट सिनेमे देऊ शकतो. मी त्यांच्या सोबत जे नातं निभावलं, तसं नातं मी माझ्या सक्ख्या नातेवाईकांसोबत सुद्धा निभावलं नाही. माझा भाऊ दिग्दर्शक आहे, पण मी त्याच्यासोबत सुद्धा 17 सिनेमे केले नाहीत.”
डेव्हिड धवन सोबतच्या भांडणाचे कारण सांगताना गोविंदाने सांगितले कि,हि पहिलीच घटना नाहीये, जेव्हा गोविंदाने डेव्हिड धवन सोबतचे नाते खराब होण्याबद्दल वार्ताहरांना सांगितले. 2014 च्या सुरुवातीला गोविंदा आणि डेव्हिड धवन ह्यांच्यामधील भांडण बाहेर माहिती होऊ लागले. तेव्हा गोविंदाने एक स्टेटमेंट दिले होते. त्यात त्यांनी सांगितले की ‘चष्मेबद्दूर’ ची कल्पना डेव्हिड धवनला त्याने दिली होती. पण अचानक त्याला कळले की त्याने ऋषी कपूरला घेऊन शुटिंग सुरु केली. २०१५ मध्ये गोविंदाने उघड उघड सांगितले होते कि, तो डेव्हिड धवन ह्यांच्यासोबत काम करू शकत नाही. कारण डेव्हिडने त्याच्या वाईट काळात साथ दिली नाही. गोविंदाने सांगितले कि डेव्हिड ला वाटू लागले आहे कि मी त्याच्या चित्रपटात काम करण्याच्या लायकीचा राहिला नाही. अश्या लोकांसोबत काम नाही करायला पाहिजे.‘जुडवा २’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अशी बातमी आली होती कि ऍक्टर-डायरेक्टर ह्या जोडीमध्ये काहीच आलबेल नाही आहे. असं ह्यामुळे सांगितले गेले कारण ‘जुडवा २’ मध्ये ओरिजनल चित्रपटाचे २ गाणे रिमेक केले गेले होते. ह्यामध्ये एक होते ‘ चलती है क्या नौ से बारा’. ह्या ओरिजिनल गाण्यात एक ओळ आहे ‘गोविंदा है हिरो उसका और माधुरी हिरोईन है.’ ह्या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जन मधून गोविंदाची हि ओळ काढून टाकली आहे. ह्या गोष्टीवरून जेव्हा डेव्हिड धवन ह्यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले कि त्याच्या आणि गोविंदा मध्ये काहीच वाद नाही आहे. डेव्हिड ह्यांनी सांगितले होते कि जर गोविंदा ह्या गोष्टीने नाराज असेल कि त्यांनी सोबत काम केलं नाही म्हणून. तर त्याचे नाराज होणे स्वाभाविक आहे. अशी कोणती गोष्ट नाही आहे, मीडिया विनाकारण अश्या गोष्टींना महत्व देत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *