aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

वयाच्या ४१ व्या वर्षीच झाला मृत्यू, व्ही शांताराम ह्यांचे नातू, बायको आहे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री

‘अशी हि बनवाबनवी’ चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. ह्या चित्रपटात सर्वांच्या भूमिका अफलातून होत्या. अशोक, लक्ष्या, सचिन, अश्विनी भावे, सुप्रिया, निवेदिता जोशी, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी, विजू खोटे ह्यासारख्या एका पेक्षा एक असलेल्या कलाकारांनी चित्रपटात अक्षरक्ष विनोदाचा धुमाकूळ घातला होता. ह्या चित्रपटात अजून एका कलाकाराने आपल्या अभिनयाने सर्वांचे मने जिंकली होती. आणि तो म्हणजे सिद्धार्थ रे. सिद्धार्थने शंतनु नावाची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने अशोक सराफ ह्यांच्या लहान भावाचा रोल केला होता. चित्रपटात इतर कलाकारांच्या तुलनेत सिद्धार्थ अगदी नवखा कलाकार होता. परंतु त्याने आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर केले. आज आपण ह्याच सिद्धार्थ बद्धल जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया सिद्दार्थच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी.

सिद्धार्थचा जन्म १९ जुलै १९६३ मुंबईत मराठी जैन परिवारात झाला. सुशांत हे त्याचे खरे नाव. तो लोकप्रिय चित्रपट निर्माते व्ही. शांताराम ह्यांचा नातू होता. व्ही. शांताराम ह्यांच्या पहिल्या पत्नी विमला शांताराम ह्यांची मुलगी चारुशीला रे ह्या त्याच्या मातोश्री. सिद्धार्थने १९७७ मध्ये आलेल्या ‘छानी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. १९८० मध्ये आलेल्या ‘थोडीशी बेवफाई’ ह्या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. ह्या चित्रपटात त्याला पद्मिनी कोल्हापुरे ह्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याने ९० च्या दशकात काही हिंदी चित्रपटात कामे केली. ‘पनाह’, ‘तिलक’, ‘गंगा का वचन’ ह्यासारख्या चित्रपटात त्याने कामे केली. परंतु मनी रत्नम ह्यांच्या ‘वंश’ चित्रपटात त्याला विशेष भूमिका मिळाली. त्यानंतर तो बॉलिवूडकरांच्या खरा लक्षात राहिला तो ‘बाझीगर’ चित्रपटामुळे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपरहिट ठरला होता. त्याने शाहरुख खान सोबत साह्याय्यक कलाकाराची भूमिका निभावली होती. त्या चित्रपटातले सिद्धार्थ वर चित्रित झालेले ‘छुपाना भी नही आता’ हे गाणे त्याकाळी लोकांनी अक्षरक्ष डोक्यावर घेतले होते.बॉलिवूडमध्ये सिद्धार्थ म्हणून ओळख असली तरी मराठी चित्रपटसृष्टीत सुशांत रे म्हणूनच त्याला ओळखत होते. १९८८ साली आलेल्या ‘अशी हि बनवाबनवी’ चित्रपटाला लोकांनी अक्षरक्ष डोक्यावरच घेतले होते. त्याकाळी म्हणजे ३० वर्षाअगोदर ह्या चित्रपटाने ३ कोटींचा गल्ला जमवला होता. त्याकाळी मराठी चित्रपटाने इतका मोठा बिजनेस करणे खूप क्वचितच घडत असे. नवोदित कलाकार असूनही सुशांतने ह्या चित्रपटात खूप छान अभिनय केला होता. त्याने १९९९ मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत विवाह केला होता. शांतिप्रिया हिने अनेक तामिळ आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमारचा सौगंध ह्या पहिल्याच चित्रपटात शांतीप्रिया अभिनेत्री होती. ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रिया हिची छोटी बहीण आहे. लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असतील अचानक ८ मार्च २००४ रोजी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सुशांतचा हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाला. त्यांना दोन मुले देखील आहेत. मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव शिष्या आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर शांतिप्रियाने चित्रपटात काम करणे खूप कमी केले होते. परंतु आता काही काळ गेल्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे. आता ती हिंदी मालिंकमध्ये काम करते. इतका हुरहुन्नरी कलाकार ऐन तरुणात परमेश्वरघरी गेला. जरी सुशांत आता आपल्यात नसला तरी ‘शंतनू’ म्हणून तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *