मुलगी सारा बद्दल ह्या गोष्टीवर भडकला सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर हे क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. सचिनला भारतरत्‍न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. सचिन आज आपल्यासाठी एक प्रेरणास्थान आहे. त्यांची क्रिकेट कारकिर्द हि तेजस्वी आणि शक्तिशाली होती, त्यामुळे आज क्रिकेट म्हणलं कि पहिल्यांदा सचिन तेंडुलकर आठवतात.

सचिन चेही एक सुंदर कुटुंब आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपले कुटुंब त्यांनी जोपासले आहे. त्यांना एक मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा आहे. मुलगा अर्जुन हा क्रिकेट मध्ये स्वतःचे करिअर करण्यास सज्ज होत आहे. आणि मुलगी सारा हि लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. परंतु साराच्या बाबतीत असे काय घडले कि सचिनला एवढा राग आला.सचिनने त्याच्या मुलीच्या सोशल मीडियावरील बनावट account वर आपला राग काढून म्हणाला की त्याची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन ट्विटर वापरत नाहीत. इतर व्यक्तींनी त्यांचे बरेच बनावट account बनवले आहेत आणि fake फोटो मिडिया वर टाकत आहेत. सचिनला याचा खूप राग आला आहे. त्यांनी असे accounts तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. सचिनच्या मते, त्याची दोन्ही मुले सोशल मिडियावर नाहीत. त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली.सारा हीचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ ला झाला. सारा तेंडुलकर लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सारा तेंडुलकर हि त्या सेलिब्रिटी मुलींपैकी एक आहे, जी नेहमी लाईम लाइटपासून दूर असते. २०१५ मध्ये असे म्हटले जात होते की सारा शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटात पदार्पण करणार आहे परंतु असे झाले नाही. पण भविष्यात कदाचित खूपच लवकर सारा चित्रपटांमध्ये दिसेल हि शक्यता आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *