टार्जन द वंडर कार मधल्या अभिनेत्याने या हॉट अभिनेत्रीबरोबर केले लग्न, पहा कोण आहे ती

बॉलीवूड मध्ये बरीच नाती बनतात आणि तुटतात देखील मात्र काही नाती खूप काळ टिकतात आणि नंतर त्यांचे लग्नही होते. काहींचे संसार सुखाचे चाललेले असतात तर काही लोक लग्न झालं कि काही दिवसांनी वेगळे होतात. आज अशाच एका अभिनेत्याची आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे “टार्जन द वंडर कार” या चित्रपटातील अभिनेता वत्सल सेठ. वत्सल याने बॉलीवूड मध्ये अभिनयाला सुरुवात करताच सगळ्यांच्या पसंतीला आला होता. “टार्जन द वंडर कार” मध्ये जो निरागस आणि भोळा चेहरा चेहरा प्रेक्षकांना आवडला त्याचे नाव वत्सल सेठ.

टार्जन द वंडर कार या चित्रपटानंतर त्याने अजून बरेच चित्रपट केले पण त्यात जास्त यश मिळाले नाही. बॉलीवूडमध्ये आपलं नाव होत नाही ओळख मिळत नाही या कारणामुळे त्याने टीव्ही शोमध्ये काम करायला चालू केले आणि नंतर त्याला बरेच शो मिळू लागले. वत्सलने थोड्या दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीबरोबर लग्न केले आहे तिचे नाव इशिता दत्ता आहे. इशिता दत्ता हि तनुश्री दत्ता ची बहीण आहे. तुम्ही सगळ्यांनी इशिता ला अजय देवगणच्या चित्रपटात पहिले असेल. होय “दृश्यम” या चित्रपटामध्ये इशिता ने काम केले आहे. दृश्यम हा चित्रपट जर तुम्ही पहिला असेन तर त्यामध्ये इशिताने अजयच्या मुलीचा अभिनय केला आहे. याच चित्रपटामधून तीने तिच्या करिअरला सुरुवात केली. यांचे लग्न मुंबईच्या इस्कॉन मंदिरात झाले. याशिवाय इशिताने आत्ताच रिलीज झालेल्या कपिल शर्माच्या “फिरंगी” या चित्रपटांमध्येही काम केले आहे. यांच्या लग्नामध्ये बऱ्याच बॉलीवूड अभिनेत्यांनी हजेरी लावली होती जस कि बॉबी देओल, सोहेल खान इत्यादी. इशिता आता २९ वर्ष्यांची सुंदर आणि आकर्षक तरुणी आहे.

2 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *