१७ वर्ष्यानंतर आपल्या हिरोईनला भेटला सलमान, बघताच मारली मिठी

आजकाल सलमान खान ‘बिग बॉस सीझन १३’ बद्दल खूपच चर्चेत आहे. या सीझन मध्ये बिग बॉसच्या घरात लिविंग रूम, बाथरूम आणि बेडरूम खूपच आलिशान असणार आहे. त्याचे फोटो नुकतेच सलमान खानने स्वत: इंटरनेटवर शेअर केले होते. नुकताच सलमान खान चा शो ‘बिग बॉस १३’ चा लॉन्च इवेंट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सलमान सोबत अमीषा पटेल, पूजा बॅनर्जी आणि अर्जुन बिजलानी उपस्थित होते. तिथे त्यांची हिरोईन अमीषा पटेल देखील होती आणि बर्‍याच वर्षांनंतर त्यांच्या बॉन्डिंग पाहायला मिळालं जे खूपच आश्चर्यकारक होत.

अलीकडेच या लॉन्चिंग इव्हेंटची काही छायाचित्रे समोर आली आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की अमीषा पटेल आणि सलमान खान यांनी २००२ मध्ये ‘ये है जलवा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने काही आश्चर्यकारक कामगिरी केली नाही परंतु या दोघांची जोडी रसिकांना चांगलीच आवडली. या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी केले होते. तर कादर खान आणि ऋषि कपूरसुद्धा मुख्य भूमिकेत दिसले होते. १७ वर्षानंतर सलमान आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. या छायाचित्रांमधून आपण पाहू शकता की सलमान खानने प्रेस मीट च्या वेळी अमीषा पटेलला मिठी मारली.सलमान आणि अमीषा अजूनही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. मुंबईतील या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सलमानने एक्सप्रेसद्वारे भव्य एंट्री केली आणि ढोल-ताश्याच्या गजराने त्याचे स्वागत केले. या वेळी प्रेस मीट दरम्यान बर्‍याच नवीन गोष्टी पाहायला मिळतील, सलमान खान आणि अमीषा पटेल यांनी खूप गप्पा मारल्या आणि सलमान खान देखील कथक नृत्यांवर नाचताना दिसला. समोर आलेल्या फोटोमध्ये सलमान या लॉन्च इव्हेंटमध्ये अमीषा पटेलसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. जर आपण लूकबद्दल बोललो तर सलमान खान नेहमीप्रमाणे डॅशिंग दिसत होता. तर दुसरीकडे अमीषा पटेल देखील खूप हॉट दिसत होती. आशा आहे कि या जोडीला पुन्हा एकदा चित्रपटात पाहता येईल पण अमीषा पटेल आजकाल बॉलिवूडमधून जणू गायबच झाली आहे. अमीषा शेवटच्या वेळी सनी देओलच्या ‘भैया जी सुपर हिट’ चित्रपट मध्ये दिसली होती जो चित्रपट फ्लॉप ठरला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *