Home / कलाकार / राखी सावंत ने उघड केले गुपित, स्वतः ने शेअर केला नवऱ्याचा फोटो

राखी सावंत ने उघड केले गुपित, स्वतः ने शेअर केला नवऱ्याचा फोटो

मित्रांनो, बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या गुप्त विवाहामुळे आणि हनीमूनच्या फोटोमुळे चर्चेत आली होती. सध्या लोकांनी तिच्या न पाहिलेलया पती बद्दल ती चर्चेत होती व अजूनही आहे. राखी सावंतने लपून लग्न झाले आहे, परंतु अजूनही तिचा नवरा नेमका कोण आहे हे समोर आल नाही. ती तिच्या नवऱ्याचे गुपित उघड करत नव्हती मात्र तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हटले कि मी माझ्या नवऱ्याचे फोटो शेअर करत आहे.

राखीचे सीक्रेट वेडिंग इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु राखी सावंतने पती रितेशचा फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर देखील केला आहे पण त्यात थोडेसे ट्विस्ट आहे. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या चाहत्यांना या ९ लोकांमध्ये तिचा पती कोण आहे याचा अंदाज लावण्यास सांगत आहे. व्हिडिओमध्ये राखी पतीसमवेत बिग बॉसच्या घरात येऊ शकते. राखीने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे की हे फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की तिचा पती कोणता आहे. त्याचबरोबर राखीच्या या पोस्टवर लोकही प्रत्युत्तर देताना दिसत आहेत.व्हिडिओमध्ये राखी एका विवाहित अवतारात दिसली आहे, ज्यामध्ये तिने मंगळसूत्र आणि डोक्यावर कुंकू लावलं आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे- “हाय फॅन्स, किती लोक माझ्या पतीला भेटायला उत्सुक आहेत, किती लोक मला बिग बॉसमध्ये पाहून उत्साहित आहेत, चला मी तुमचे काम सोप्पे करते.” मी या व्हिडिओ सह काही फोटो पोस्ट करीत आहे. माझा नवरा कोणता आहे हे तुम्हाला ओळखावे लागेल. ज्यांच्याशी मी लग्न केले आहे.” असं म्हणत राखीने व्हिडीओ पाठवला आहे आणि लोकांना त्यातून तिचा नवरा ओळखायचा आहे.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.