या मुलीचं अक्षर पाहून कम्प्युटरला देखील लाज वाटेल

मित्रानो आपण शाळा कॉलेज ला असताना आपल्याला वाटत असेल कि, आपलं अक्षर सुंदर असावं. तुमच्या अनेक मित्र मैत्रिणीचं अक्षर तुम्ही पाहिलं असेल किती सुंदर आहे. त्यांचं अक्षर पाहून तुम्ही देखील आपलं अक्षर सुधरवण्याचा प्रयत्न केला असेल पण ते काही नीट झालं नसेल. माणसाच्या अक्षरावरून देखील त्यामधील असणाऱ्या कौशल्यांची ओळख करून घेता येते. अनेकांचं अक्षर तर सुंदर असतंच मात्र आम्ही ज्या मुलीबद्दल आज बोलणार आहोत तीच अक्षर जणू कम्प्युटर मधून काढलेल्या प्रिंट प्रमाणे सुंदर आहे.

नेपाळ मध्ये राहणारी एक मुलगी आहे जिचे नाव आहे “प्रकृती मल्ला”. प्रकृती चे अक्षर पाहून लोक आश्यर्यचकित होतात त्यांना वाटते जणू हि प्रिंटआऊटच काढलेली आहे. इतके सुंदर अक्षर असणारी हि मुलगी नेपाळ मधील रहिवासी आहे. प्रकृती हि इयत्ता आठवी मध्ये शिकणारी मुलगी आहे. नेपाळमधील सैनिक आवसीय महाविद्यालयात ती शिकते. प्रकृती च्या अक्षराला घेऊन नेपाळच्या सरकारने आणि तेथील सेनाने तिला पुरस्कार देखील दिले आहेत. तुम्ही देखील फोटोमध्ये तिचे अक्षर पहिले असेल किती सुंदर आहे.सुंदर अक्षर असण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्ही ऐकलेच असेल. अक्षर सुंदर असेल तर पेपर तपासनार्यावर किंवा अक्षर वाचनाऱ्यावर पण त्याचा चांगला प्रभाव पडतो. सुंदर अक्षरामुळे मार्क देखील जास्त दिले जातात. इतक्या कमी वयात इतकं सुंदर अक्षर म्हणजे एक चमत्कारच आहे. सोशल मीडियावर या मुलीचं खूप कौतुक झालं आहे आणि अजूनही होत आहे. प्रकृती च्या नातेवाईकांनी असे सांगितले कि ती रोज दोन तास आपल्या अक्षरावर सराव करत होती म्हणूनच आज तिचे अक्षर इतके चांगले आहे. प्रकृती च्या सुंदर अक्षराचे फळ देखील तिला मिळाले आहे.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *