ज्या मालिकेत काम करताना आई सोडून गेली, त्यातच होईल मुलीची धमाकेदार एंट्री

बॉलिवूडमधील मोठ्या मोठ्या स्टार्सच्या आईची भूमिका साकारणारी रीमा लागू या सर्वांना माहित असतीलच? होय, रीमा लागूंचे गेल्या वर्षी निधन झाले होते, त्यामुळे बॉलिवूड शोक व्यक्त करत होते. आजही रीमा विसरलया गेल्या नाहीत, कारण त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक मोठे स्थान निर्माण केले होते. जरी त्या आपल्यात आज नसतील तरी आजही लोक त्यांना पूर्वीसारखेच पसंत करतात. बॉलिवूड अभिनेत्री रीमा लागू याना शेवटच्या वेळी एका मालिकेत काम करताना पहिले गेले होते.

होय, आम्ही त्याच सिरीयलबद्दल बोलत आहोत ज्यात काम करत असताना रीमा यांचं निधन झालं होत. तुम्हाला सांगू इच्छिते की रीमा शेवटच्या वेळी ‘नामकरण’ या मालिकेच्या सेटवर दिसलया होत्या. त्यामध्ये त्या दयावंतीची भूमिका साकारत होत्या. रिमाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्या मालिकेत रीमाचे पात्र नकारात्मक होते, पण त्यांच्या दमदार अभिनयामुळे आज या मालिकेला टॉप शो चे स्थान मिळाले आहे. टीव्ही वरील नामकरण मालिकेत काम करत असताना रीमा यांचे निधन झाले. पण आता बातमी अशी आहे की या मालिकेत त्यांची मुलगी दिसणार आहे. होय, माहिती नुसार रीमा लागूची मुलगी मृण्मयी लागू हि मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेमध्ये काम करण्यासाठी निर्मात्यांनी मृण्मयी शी संपर्क साधला, त्यानंतर त्यासाठी हो देखील म्हटले आहे. रीमा लागू यांची मुलगी मृणमयी आईप्रमाणेच अभिनयाच्या विश्वात प्रसिद्ध आहे. मृण्मयी मराठी चित्रपटांमध्ये काम करते, यामुळे तिला बॉलिवूड अभिनेत्रीं प्रमाणे ओळख मिळाली नाही. मात्र मृण्मयी ने ‘३ इडियट्स’ आणि ‘तलाश’ या चित्रपटांना असिस्ट केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये आपली ओळख केल्यानंतर आता मृण्मयी छोट्या पडद्यावरही मोठा प्रभाव पाडण्यास तयार आहे. लीप नंतर ‘नामकरण’ मालिकेत, रीमा लागूची मुलगी मृण्मयी धमाकेदार एन्ट्री घेणार आहेत. तसंच आपणास हे सांगू इच्छिते की, या मालिकेत तिच्या आईप्रमाणेच मृण्मयीही नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *