ऐश्वर्याची खिल्ली उडवल्यानंतर विवेक आणि अभिषेक समोरासमोर आले

काही महिन्यांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चन बद्दल विवेक ने एक मीम पाठवला होता. त्या मीम मध्ये सलमान, विवेक आणि अभिषेक सोबतच्या ऐश्वर्याच्या संबधांची माहिती होती. सोबत जसं-तसं त्या विनोदाला लोकसभा मतदानाच्या कारणांशी जोडलं गेलं होतं. सर्व मिळून सांगायची गोष्ट ही आहे कि, हा एक फालतू जोक असून, तो विवेक ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट केलेला. या सर्व गोष्टीमुळे सोशल मीडिया बरोबर संपूर्ण बॉलिवूडची त्याला खूप बोलणी ऐकावी लागली. त्याने शेअर केलेला मीमचा फोटो आम्ही खाली दिला आहे, तुम्ही नंतर तो पाहू शकता. परंतु बच्चन कुटुंबियांनी या गोष्टीवर गप्प राहणंच योग्य समजलं. ही गोष्ट घडल्याच्या 3 महिन्यानंतर असं झालं की, विवेक ओबेरॉय आणि अभिषेक बच्चन हे दोघे समोरासमोर आले.

BWF वर्ल्ड चैंपियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकून भारतात परत आलेली पिवी सिंधूला मुंबईत एका समारंभात सन्मानित केलं जाणार होतं. हा समारंभ सहारा चे मुख्य ‘सुब्रत रॉय सहारा’ यांनी प्रस्थापित केला होता. यावेळी समारंभात बॉलिवूडची बहुतेक कलाकारमंडळी हजर होती. इथे अमिताभ यांचा मुलगा अभिषेक सोबतच सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा विवेक आणि सून प्रियांका बरोबर पोहोचले. लाल कार्पेट वर दोन्ही कुटुंबीय सामोरा समोर आले. या आधी काही चुकीचे घडण्या अगोदर अभिषेक पटकन पुढे झाला आणि विवेक व त्याच्या पत्नीला अलिंगन दिले. दुसरीकडे अमिताभ बच्चन आणि सुरेश ओबेरॉय यांची पण भेट झाली. पण अमिताभने सुरेशला टाळाटाळ केली. तो व्हिडीओ आपण इथे पाहू शकता.आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या कुटुंबांची दुश्मनी फार जुनी आहे. जसं विवेक ओबेरॉय करियर खराब होण्याचा दोष सलमान खान च्या डोक्यावर फोडतो. तशीच गोष्ट सुरेश ने अमिताभ बच्चन बरोबर केली होती. तेव्हा पासून या दोन्ही कुटुंबाचे संबंध चांगले नाहीत. नंतर अभिषेक आणि ऐश्वर्या चा लग्न झालं, तेव्हा या गोष्टी आणखी चिघळल्या. कारण ऐश्वर्या आणि विवेकचा पण भूतकाळ होता. या मुश्कीलींचा जोर बघून वाटत होतं की, सिंधू च्या सन्मान समारंभात हे दोन कुटुंबीय एक दुसऱ्याला टाळाटाळ करून पुढे जात आहेत. परंतु असे झाले नाही आणि याचे श्रेय जाते अभिषेक बच्चन याला. अभिषेक मागच्या वेळी अनुराग कश्यप चा सिनेमा ‘मनमर्जिया’ मध्ये दिसला होता. त्याचप्रमाणे विवेक चा मागील सिनेमा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी च्या आत्मकथेवर आधारित होता. मजेशीर गोष्ट ही आह कि, अभिषेक आणि विवेक या दोघांनी मणीरत्नम च्या युवा (२००४) सिनेमात एकत्र काम केले आहे. या सिनेमात अजय देवगण, राणी मुखर्जी, करीना कपूर आणि ईशा देओल यांनीही काम केलं होतं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *