हृतिक सोबत असणारा हा मुलगा आता आहे बॉलिवूड किंग, ओळखलं का तुम्ही

मित्रानो तुमच्याकडे देखील काही लहानपणीचे फोटो असतील. ते फोटो जर आपण आज पहिले तर आपण आठवणींमध्ये रमून जातो. त्यावेळी आपण कसे दिसत होतो आणि आता आपल्यात किती बदल झाला हे देखील आपण पाहतो. अनेक लहानपणिनीचे फोटो असे असतात कि वाटत नाही कि हि तीच व्यक्ती आहे. वयानुसार शरीराच्या वाढीमुळे आपल्या शरीरासोबत चार देखील बदलतो. आज असाच एक फोटो एका मोठ्या अभिनेत्याने शेअर केला आहे. अनेकांनी फोटो पाहूनच त्याला ओळखले असेल पण ज्यांनी ओळखले नाही त्यांनी जास्त विचार करू नये.

ह्रितिक सोबत असणारा हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून विकी कौशल आहे. विकीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. विकीने सांगितलं कि ह्रितिकच्या “फीजा” या चित्रपटाच्या वेळी मी सेटवर गेलो होतो तेव्हा हा फोटो काढला. त्यावेळी मी देखील ह्रितिक रोशनचा एक फॅनच होतो. मी माझ्या कपटाचा खन साफ करताना हा फोटो पाहिला.” फोटो शेअर करत त्यावेळी घडलेले अनेक अनुभव देखील फोटोसहित लिहून विकी कौशल ने शेअर केले. विकीने पुढे लिहले कि, “मला त्यावेळी सांगितले होते कि ज्यांना ‘इक पल का जिना’ या गाण्यावर नाचता येत त्यांनाच ह्रितिक रोशनला भेटता येईल. मी सुद्धा तीन चार दिवस त्या गाण्यावर नाचायची तयारी करत होतो. मात्र ज्यावेळी मी ह्रितिकला प्रत्यक्ष भेटलो तो क्षण मी शब्दात सांगू शकत नाही. मला झालेला आनंद खूप वेगळाच होता.” तुम्हाला विकीचा हा आनंदाचा क्षण कसा वाटला. तुम्ही देखील कोणत्या सेलिब्रिटीला भेटला असाल, किंवा जुन्या आठवणींमध्ये रमून गेला असाल. आठवणींमध्ये रमणारी अनेक लोक असतात आणि विकीच्या या पोस्ट वरून समजून येतेच कि, तो देखील त्यांपैकीच एक आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *