मुलाबद्दल मलाईका अरोरा म्हणाली कि, अर्जुन सोबत रिलेशन मध्ये आहे पण

बॉलीवूड अभिनेत्री मलाईका अरोरा हि अर्जुन कपूरबरोबर न्यूयॉर्कमध्ये एकमेंकासोबत राहत आहेत. त्यांनी काही फोटोस सुद्धा सोशल मीडियावर टाकले आहेत. बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचे हे नाते तिने आत्ताच काही दिवसांपूर्वी स्वीकार केले आहे. तिने आत्ताच एक फोटो इंस्टाग्राम वर टाकला होता त्यात दोघांनीही त्यांच्या या नात्याचा स्वीकार केला आहे. मलाईकाने एक मुलाखत पण दिली होती त्यावेळी तिने तिच्या मुलाबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. चला तर मग त्यांच्याबद्दल अजून माहिती जाणून घेऊयात.

न्यूयॉर्कमध्ये आपल्या बॉयफ्रेंड बरोबर सुट्ट्या घालवत असताना तिने तिच्या आई होण्याच्या भूमिकेबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्यावर आरोप लावला होता कि ती आईची जबाबदारी निभावत नाहीये. याच्याव्यतिरिक्त मलाईकाने अरबाज खानबद्दल सुद्धा एक गोष्ट बोलली आहे ज्यामुळे तिची ती मुलाखत खूप प्रसिद्ध होत चालली आहे. मलाईकाने अरबाजला घटस्फोट दिला आहे त्यामुळे ती चर्चेमध्ये आहे. माझी जबाबदारी नाही बदलली – मलाईका अरोरा मलाईका बोलत होती की मी आजही एक आई आहे आणि तिच्या जबाबदाऱ्याही काही बदलल्या नाहीत. मलाईका असंही बोलली कि मी रिलेशनशिप मध्ये आहे पण याचा असा अर्थ नाही कि मी माझ्या मुलावर लक्ष नाही देऊ शकत. मी माझ्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या पद्धतीने निभावत आहे. या गोष्टीवर कोणाला बोलायची गरज नाही. मलाईका आणि त्यांचा मुलगा या दोघांमध्ये खूप चांगले संबंध आहेत आणि ते एकमेकांना खूप चांगल्या रीतीने समजून घेतात. माझा मुलगा माझी पहिली जबाबदारी मलाईका बोलते कि मी जेव्हा अरबाज पासून वेगळे झाले तेव्हा मी खूप निराश होते कारण मला माझ्या मुलांचे चांगले संगोपन करायचे होते परंतु नंतर मी त्याला आणि स्वतःलाही सांभाळले. मलाईकाने असे सांगिले कि माझा मुलगा मला खूप चांगले समजतो आणि मी सुद्धा. त्याने माझ्या आयुष्यात मला पुढे जाण्यासाठी साथ दिली आहे आणि त्याचे क्रेडिट मी त्याला देऊ इच्छिते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *