NMJOKE

बुरखा न घालता महिला घराबाहेर पडत आहेत, नको त्या नजरेने पाहणाऱ्या लोकांना दिले

सौदी अरेबियातील महिलांनी बुरखा न घेता घर सोडण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी काही महिला राजधानी रियाधच्या रस्त्यावर जीन्स आणि टॉप घालून फिरताना दिसल्या. त्यावेळी लोक त्यांच्याकडे एकटक पाहू लागले. काहींनी महिलांच्या कपड्यांवरून पोलिसांना फोन करण्याची धमकीही दिली. सौदीमध्ये पारंपारिक काळा बुरखा घालणे हा महिलांचा पोशाख मानला जातो आणि स्त्रियांची पवित्रता म्हणून पाहिले जाते. खरंतर सौदी चे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी नुकत्याच एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की महिलांना ड्रेस कोडमधून सूट मिळू शकते. इस्लाममध्ये बुरखा अनिवार्य नाही, परंतु औपचारिक नियम अथवा कायदा नसल्यामुळे तेथे सराव होत नाही.

सौदी चे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी असं म्हटल्यापासून बर्‍याच महिलांनी येथे बुरखा घालणे बंद केले आहे. ३३ वर्षीय एचआर तज्ज्ञ मशाल-अल-जालुद मॉलमध्ये ट्राउझर्स आणि गडद नारिंगी रंगाच्या टॉपमध्ये फिरत होती. तिने अशी कपडे घातल्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार करू असे सांगत जमावातील अनेकांनी तिला धमकावले. त्यावर उत्तर मिळाले कि, ‘प्रिन्स स्वत: म्हणाले आहेत की कायदा अगदी स्पष्ट आहे तसेच शरिया मध्ये लिहिले आहे की स्त्रियांनी पुरुषांप्रमाणेच सभ्य आणि सन्माननीय वस्त्र परिधान करावे. स्त्रियांनी काळ्या रंगाचा बुरखा किंवा काळा मुखवटा घालावा असे म्हटले नाही.’जर स्त्रियांना कपड्यात स्वातंत्र्य मिळत असेल तर लोकांना त्रास का होत आहे हा मोठा प्रश्न. सौदी अरेबियामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून महिलांनी सोशल मीडियावर बुरख्यापासून मुक्ततेसाठी मोहीम राबविली आहे. सौदी अरेबियातील सोशल मीडियावर बर्‍याच महिला आपले फोटो आधुनिक वेशभूषेत शेअर करत आहेत. २५ वर्षीय मनहेल-अल ओताबी म्हणाली- “मी गेल्या चार महिन्यांपासून बुर्काविना राहत आहे. मला निर्बंधांशिवाय जगायचे आहे. मला जे नको आहे ते घालण्यास कोणीही सक्ती करु नये.”
Exit mobile version