घरातून बाहेर निघत नव्हता उद्योगपती, पोलिसांनी धरून काढले बाहेर

मित्रानो आता स्पर्धेचं युग आहे हे तर तुम्हाला माहित असेलच. सध्या अनेक कंपन्यांमध्ये मंदीची लाट आहेत त्यामुळे लोक जपून खर्च करत आहेत. अनेक जण बँकांकडून किंवा इतर कोणाकडून कर्ज घेतात काही जण फसवणूक करतात तर काहीजण स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घेतात. कर्ज फेडले नाही तर बँक ती रक्कम तुमच्याकडून वसूल करत असते. कर्ज घेताना तारण देखील ठेवलेले असते त्यावरच बँक जप्ती आणते आणि कर्जाची दिलेली रक्कम घेते. मात्र अशी एक घटना घडली आहे कि, एका उद्योगपतीने ७० करोड रुपयांचं लोन घेतलं होत पण ते कर्ज तो फेडत नव्हता म्हणून पोलिसांच्या मदतीने त्याला घरातून बाहेर काढले.

७० करोड रुपयांची रक्कम मागण्यासाठी बँकेचे कर्मचारी उद्योगपतींकडे गेले होते त्यावेळी ते बंगल्यावर कब्जा करून तो रिकामा करणार होते. मात्र घरच्यांनी आतून काड्या लावून घेतल्या त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यात यश आले नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना एक दिवसाचा वेळ देऊन बंगला रिकामा करण्यास सांगितलं. गीता भवन मध्ये राहणारे उद्योगपती सत्यनारायण राठी यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया चे ७० करोड रुपयांचे कर्ज होते. बँकेचे कर्मचारी जेव्हा कर्जाची रक्कम मागायला गेले होते त्यावेळी उद्योगपती सत्यनारायण राठी यांनी त्यांना दम दिला होता. त्यानंतर बँकेचे अधिकारी पोलिसांजी फौज घेऊन बंगल्यावर ताबा मिळवण्यासाठी गेले.पोलीस आल्यावर उद्योगपती सत्यनारायण राठी पोलिसांच्या पाय पडू लागले पण पोलिसांनी त्याला बाहेर काढले आणि बँकेला बंगल्याचा ताबा दिला. तहसीलदार आनंद मालवीय यांच्यासोबत गेलेल्या टीम ने नंतर उद्योगपती सत्यनारायण राठी यांच्या प्लाॅट, दुकान आणि ऑफिस वर देखील कब्जा करून संपत्ती बँक जमा केली. राठी म्हणाले कि जे करोडो रुपये घेऊन पळाले त्यांच्यावर कार्यवाही होत नाही आम्ही प्रामाणिकपणे काम करून आम्हाला बंगल्याबाहेर काढले. हि घटना इंदौर मध्ये घडली आहे. पोलिसांना पाहून देखील राठी बंगल्यातून बाहेर निघत नव्हते ते खाली बसून राहिले. बाहेर निघत नसल्याने हात पाय पकडून त्यांना बाहेर काढण्यात आले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *