NMJOKE

लोकांना आवडत आहे ट्राफिक पोलिसांपासून वाचण्याचा हा उपाय

मित्रानो २०१९ मध्ये नवीन मोटर व्हीकल एक्ट पारित करण्यात आला. यामध्ये गाडी चालवण्याचे नियम मोडल्यास खूप मोठी रक्कम दंड म्हणून आकारली जात आहे. अनेक नियम गाडी चालवताना लागू असतात हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, दारू च्या नशेत गाडी चालवणे असे कितीतरी नियम मोडल्यास पूर्वी पेक्षा कितीतरी जास्त पटीने दंड आकारले जात आहेत. अनेक दंड असे आहेत कि तितक्या किमतीची गाडी देखील नाही. या जास्त मोठ्या रकमेमुळे लोक सोशल मीडियावर या नियमाची खिल्ली उडवत आहेत तर काही लोक त्यापासून वाचण्याचे नवीन उपाय शोधत आहेत.

जेव्हा हा कायदा अथवा नियम लागू झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक सोशल मीडियावर विनोद करू लागले. काही जणांना गाडीपेक्षा जास्त किमतीचा दंड देखील आकारला गेला. मित्रानो असे नियम आले जरी असले तरी त्यावर भारतीय जनता उपाय तर शोधत असतेच. आम्ही एक व्हिडीओ तुम्हाला दाखवणार आहोत तो नवीन रकमेचा कायदा येण्यापूर्वीचा आहे. मात्र हा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे कारण याला लोक दंडांपासून वाचण्यासाठी उपाय म्हणून शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये अनेकजण आपली गाडी ट्राफिक हवालदारासमोर हाताने ढकलून नेताना दिसत आहेत. हाताने गाडी नेत असल्यामुळे ट्रॅफिक पोलीस त्यांना पकडत नाहीत. अनेकजण आपल्या गाडीचे कागदपत्रे सोबत घेऊन नियमांचे पालन करीत आहेत. कधीही न घालणारे लोक हेल्मेट घालत आहेत. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हे नवीन नियम जास्त प्रमाणात लागू होतात. पंतप्रधान मोदींच्या राज्यात म्हणजेच गुजरातमध्ये या दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे. गुजरातच नाही तर अनेक असे राज्य आहेत ज्यांमध्ये नवीन कायद्यानंतर रक्कम कमी करण्यात आली. महाराष्ट्रात मात्र रकमेमध्ये सवलत दिलेली नाही.

 

नियम आल्यानंतर अनेक लोकांचे असे मत आहे कि, रस्ता अगोदर चांगला करा. सगळीकडचे रस्ते खराब आहेत आणि त्यामुळे अनेकांचे मृत्यू देखील झाले आहे. पण सरकार मात्र इतका दंड आकारून गरिबांची लूट करत आहेत. सामान्य नागरिक रोज वेळेवर कामावर जातात कर्ज काढून गाडी घेतात कारण कामावर वेळेवर पोहचता यावं. नियमांचे पालन करून देखील अनेकांना सरकारच्या अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. अश्यात हे नवीन नियम आल्याने सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. अनेकांना पगार १० ते २० हजार असतो त्यात ते घर चालवतात मात्र जर एखाद्या वेळेस दंड भरावा लागला तर ती व्यक्ती ५ हजार रुपयांचा दंड कसा भरेल हा मोठा प्रश्न.

Exit mobile version