मित्रानो २०१९ मध्ये नवीन मोटर व्हीकल एक्ट पारित करण्यात आला. यामध्ये गाडी चालवण्याचे नियम मोडल्यास खूप मोठी रक्कम दंड म्हणून आकारली जात आहे. अनेक नियम गाडी चालवताना लागू असतात हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, दारू च्या नशेत गाडी चालवणे असे कितीतरी नियम मोडल्यास पूर्वी पेक्षा कितीतरी जास्त पटीने दंड आकारले जात आहेत. अनेक दंड असे आहेत कि तितक्या किमतीची गाडी देखील नाही. या जास्त मोठ्या रकमेमुळे लोक सोशल मीडियावर या नियमाची खिल्ली उडवत आहेत तर काही लोक त्यापासून वाचण्याचे नवीन उपाय शोधत आहेत.

#India #Gurgaon This is New India- Jugaad 😀
— AJ (@arunjitmanna) September 3, 2019
नियम आल्यानंतर अनेक लोकांचे असे मत आहे कि, रस्ता अगोदर चांगला करा. सगळीकडचे रस्ते खराब आहेत आणि त्यामुळे अनेकांचे मृत्यू देखील झाले आहे. पण सरकार मात्र इतका दंड आकारून गरिबांची लूट करत आहेत. सामान्य नागरिक रोज वेळेवर कामावर जातात कर्ज काढून गाडी घेतात कारण कामावर वेळेवर पोहचता यावं. नियमांचे पालन करून देखील अनेकांना सरकारच्या अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. अश्यात हे नवीन नियम आल्याने सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. अनेकांना पगार १० ते २० हजार असतो त्यात ते घर चालवतात मात्र जर एखाद्या वेळेस दंड भरावा लागला तर ती व्यक्ती ५ हजार रुपयांचा दंड कसा भरेल हा मोठा प्रश्न.