विक्रम लॅण्डर सोबत होऊ शकतो का पुन्हा संपर्क? इसरो वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले

मित्रानो शनिवारच्या मध्य रात्री २ वाजण्याच्या भारताचे चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मोदी सोबत अनेक लोक त्यावेळी तेथे उपस्थित होते तसेच लाईव्ह प्रक्षेपण देखील लोक युट्युब वर टीव्हीवर पाहत होते. सॉफ्ट लँडिंग होत असताना २.१ किलोमीटर अंतर राहिले असताना नियंत्रण कक्षेसोबतचा संपर्क तुटला. इसरो चे अध्यक्ष सिवन म्हणाले कि, सॉफ्ट लँडिंग झाली मात्र संपर्क तुटल्याने पुढचं मिशन होऊ शकलं नाही. त्यानंतर इसरो ने विक्रम सोबत संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला.

चांद्रयान २ च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, “लॅण्डर सोबत कोणताही संपर्क नाही आहे. हा पूर्णपणे संपला आहे त्यामुळे कोणतीच आशा नाही आहे. लॅण्डर सोबत पुन्हा संपर्क साधने खूपच कठीण काम आहे.” चांद्रयान २ च्या मिशन मध्ये पाठवलेला विक्रम लॅण्डर १४७१ किलोचा होता आणि भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवला असून तो चंद्राची माहिती घेणार होता. लँडरचे हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम ए साराभाई यांच्यावरून दिले गेले होते. सॉफ्ट लँडिं करण्याच्या हिशोबाने त्याला बनवले गेले होते.चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस हा विक्रम लॅण्डर चंद्रावर काम करणार होता. लँडरच्या आतमध्ये २७ किलोग्रॅम वजन असणारा रोवर प्रज्ञान होता. सौर ऊर्जेच्या आधारावर चालणाऱ्या या प्रज्ञान रोवर ला ५०० मीटर पर्यंत चंद्रावर चालून तेथील माहिती मिळवण्यासाठी आणि नियंत्रणकक्षेपर्यंत पोहचवण्यासाठी बनवले गेले होते. रोवरच लोकेशन मिळवण्यासाठी इसरो ला यश आले आहे. जर रोव्हर सोबत संपर्क झाला तर भारताचं हे मिशन नक्कीच यशस्वी होईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *