Home / कलाकार / या मुलीने सुरु केला असा उद्योग ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल

या मुलीने सुरु केला असा उद्योग ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल

मित्रानो प्रत्येकामध्ये एक कला असते हे वाक्य तुम्ही आजवर अनेकदा ऐकले असेल. अनेक मुलांना तुम्ही त्या कलेमध्ये निपुण झालेलं देखील पहिले असेल. आजच्या काळात जीवन जगण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी माणूस काहीही डोकं लावतो. पैसे कमावण्यासाठी अनेक उद्योग धंदे आहेत मात्र काहीतरी नवीन करून अनेकजण श्रीमंत होतात. हैदराबादमधील एका मुलीने देखील असाच एक मोठा पराक्रम गाजवला आहे. ‘श्रुती रेड्डी’ या मुलीने एक अनोखा उद्योग सुरु केला आहे ज्याची आजवर कोणी कल्पना देखील केली नसेल आणि धाडस देखील.

श्रुती रेड्डी ने अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य विकण्याचं काम सुरु केलं आहे. “अंत्येष्टी फ्युनरल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड” या नावानी तिचा उद्योग खूप मोठा झाला आहे. तिची हि कंपनी ऍम्ब्युलन्स, श्राद्ध पूजा यासोबत अंतिम संस्कारासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवते. अनेक जातींमध्ये, धर्मांमध्ये विविध प्रकारचे विधी केले जातात त्या अनेक विधींच्या रीतसर पद्धतीने साहित्य श्रुतीची कंपनी पुरवते. तिच्यासोबत चार ते पाच जण देखील काम करतात. श्रुतीने हा ऑनलाईन उद्योग सुरु केला आहे. श्रुतीला या उद्योगासाठी सुरुवातीला नातेवाईकांकडून घरच्यांकडून विरोध होता. मात्र नंतर तिला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. जेव्हा तिच्या आजोबांचं निधन झालं त्यावेळी तिच्या कुटुंबाला अंत्यविधीसाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळेच तिला हि युक्ती सुचली आणि तिने हा उद्योग सुरु केला. पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्रुतीने जवळपास नऊ वर्षे सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर काम देखील केलं आहे. त्यामुळेच तिला आपला उद्योग ऑनलाईन नेण्यासाठी जास्त कष्ट करावे लागले नाहीत. तुम्ही तीच काम बघून नक्कीच चकित झाला असाल मात्र हे देखील गरजेचे आहे.

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.