एकेकाळी छोट्या पडद्यावर राज्य करत होत्या या ५ अभिनेत्र्या, आता नाही मिळत काम

बॉलीवूडबरोबरच टीव्ही जगामध्येही बऱ्याच अभिनेत्रीने नाव कमावले आहे. या अभिनेत्रीनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात खूप नाव कमावले आहे पण आता त्या पडद्याआड गेल्या आहेत. या अभिनेत्रींना खूप दिवसांपासून काम मिळत नाहीये. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल बोलत आहे जे खूप कमी दिवसांमध्ये स्टार बनल्या आहेत आणि आता त्या गायब झाल्या आहेत. १) राजश्री ठाकूर : झी टीव्हीवर येणाऱ्या ‘साथ फेरे’ मधली सलोनी म्हणून अभिनय करणाऱ्या राजश्रीला त्यावेळी दर्शकांनी खूप पसंत केले.

२) रागिणी खन्ना : २००८ मध्ये ‘राधा कि बेटीयां’ या सिरिअलमध्ये काम करून हिने खूप यश मिळवले. यानंतर तिने ससुराल गेंदा फूल, बात हमारी पक्की, सपना बाबुल का बिदाई, एक हजारों मी मेरी बहना अशा अनेक सिरिअल्समध्ये काम केले. याबरोबर टीव्हीच्या रिअलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. परंतु ती हळू हळू गायब होत चालली आहे आणि आता खूप दिवसापासून तिला काम मिळाले नाही. ३) श्वेता तिवारी : एक वेळ अशी होती कि श्वेता हि खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘कसौटी जिंदगी कि’ मध्ये तिने प्रेरणा ची भूमिका केली होती आणि ती लोकांच्या खूप पसंतीस आली होती. ४) तारा शर्मा : ताराने बॉलीवूड चित्रपटापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. पण तिला तिथे यश मिळाले नाही त्यामुळे तिने टीव्ही सीरियलमध्ये काम चालू केले. तिने खूप टीव्ही सिरिअल्स मध्ये काम केले पण आता ती कोणत्याही शोमध्ये दिसत नाही . तिचे वय आता ४१ वर्षे झाले आहे.५) मृणाल कुलकर्णी : स्वतःच्या करिअरची सुरुवात १६ व्या वर्षांपासून करणाऱ्या मृणालचे वय आता ५० वर्षे झाले आहे. तिने सोनपरी या टीव्ही शोमध्ये काम केले होते आणि ती लहान मुलांच्या खूप पसंतीस आली. पण आता ती टीव्हीवर दिसून खूप वेळ होऊन गेला. भारतभर ओळख असणारी मृणाल आता मराठी चित्रपटांमध्ये झळकते मात्र हिंदी क्षेत्रामध्ये दिसत नसल्याने भारतभर तिची सध्या ओळख कमी झाली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *