ऐश्वर्यासाठी अभिषेख ने सोडलं होत या अभिनेत्रीला, दहा महिने होत अफेअर

अभिषेक बच्चन आज ४२ वर्षांचे झाले आहेत. ५ फेब्रुवारी १९७६ ला मुंबई येथे अभिषेकचा जन्म झाला. अभिषेकचे २००७ साली ऐश्वर्याबरोबर लग्न झाले. यांच्या लग्नाला एवढे वर्षे होऊनही आजही ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. ऐश्वर्यापूर्वी अभिषेक एका सुंदर अभिनेत्रीला पसंत करत होता. तुम्हाला वाटत असेन कि इथे करिष्मा कपूरबद्दल बोलत आहोत. पण हे चुकीचं आहे. हे खरं आहे कि करिष्माबरोबर त्यांचे लग्न तुटले होते पण करिष्माशिवाय एक अजून अशी अभिनेत्री आहे जिच्यावर अभिषेकचे मन आले होते.

असं म्हणलं जात कि अभिषेकने ऐश्वर्यासाठी त्या अभिनेत्रीला धोका दिला आहे. आपण जिच्याबद्दल बोलत आहोत ती एक सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल दीपानीता शर्मा आहे. सुमित जोशीचे ‘अफेअर्स ऑफ बॉलीवूड स्टार्स रिव्हील्ड’ या पुस्तकामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे कि अभिषेक आणि दीपानीता यांना सोनाली बेंद्रेने एकत्र आणले होते. दीपानीता आणि सोनाली या दोघेही चांगल्या मैत्रिणी होत्या. दीपानीता आणि अभिषेक यांचे १० महिन्यानंतर ब्रेकअप झाले. रिपोर्टस पाहिले तर असे समजून येते कि अभिषेक दीपानीताच्या मागे लागले होते. त्यांनी २ महिने दीपानीताला फोन केले आणि भेटण्याची इच्छा समोर मांडली. परंतु दीपानीताला अभिषेक मध्ये जास्त काही खास वाटले नाही. असं बोलल जात कि दीपानीताचा प्रामाणिकपणा आणि तिची हुशारी पाहून अभिषेकला ती खूप आकर्षित करत होती. फ्रीडम फायटरच्या कुटुंबातून आलेली हि दीपानीता, तिला असे वाटत नव्हते कि तिने फिल्म इंडस्ट्रीमधल्या कोणत्याही अभिनेत्याला डेट करावे. परंतु अभिषेकने तिचे मन मोहून घेतले होते. अभिषेक नेहमी त्याचे आणि दीपानीताचे नाते मीडियापासून दूर ठेवत होते. या गोष्टीवर कोणी प्रश्न विचारला तर ते साफ नकार देत होते. दीपानीताच्या एका नातेवाईकाने सांगितले होते कि ते दोघेही दुसर्यांना वेडे बनवत आहेत. दीपानीताने एकदा अभिषेकाच्या जन्मदिवसाच्यावेळी पार्टी ठेवली होती आणि तसे तिने अभिषेकला सुद्धा सांगितले होते. परंतु त्यावेळी अभिषकने तिला शूटिंग मध्ये व्यस्त आहे आणि वडिलांची तब्येत ठीक नाही यामुळे येऊ शकत नाही असे संगितले. दीपानीताला अभिषेकने त्याच्या जन्मदिवसाच्यावेळी वेळी एक मोठा कार्यक्रम ठेवला होता, त्यामध्ये त्याने दीपानीताला बोलवले सुद्धा नाही तर त्याने ऐश्वर्याला बोलवले होते. मॉडेलिंगच्यावेळी दीपानीता आणि बिपाशा दोघी एकत्र राहत होत्या. बिपाशाने दीपानीताला आधीच सांगितले होते कि अभिषेक हा ऐश्वर्याला पसंद करतो. दीपानीता शर्मा हि ३८ वर्षांची असून ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने १९९८ मध्ये मिस इंडिया च्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये स्वतःची जागा कमावली होती. दीपानीताने ‘१६ दिसंबर’, ‘लेडीस वर्सेस रिकी बहल’ आणि ‘कॉफी विद डी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *