घटस्फोटानंतर आनंदाचे जीवन जगत आहेत या अभिनेत्र्या, चौथी ने तर तोडलं होत सलमान च हृदय

मित्रांनो बॉलीवूडमध्ये असे बरेच अभिनेते-अभिनेत्र्या आहेत ज्यांची लग्न झाली आहेत. काहीजण अजूनही सुखाचा संसार करत आहेत तर काहीजण घटस्फोट घेऊन राहत आहेत. आज आपण अशाच ५ अभिनेत्यांची माहिती बघणार आहोत ज्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊनही आज खूप चांगले जीवन जगत आहेत. १) करिष्मा कपूर : ९०च्या दशकातील खूप सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. तिने २००३ मध्ये व्यावसायिक संजय कपूर बरोबर लग्न केले. मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप वादविवाद होऊ लागले. त्यामुळे २०१७ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आज करिष्मा तिच्या दोन्ही मुलांबरोबर वडिल्यांच्या घरी आनंदात आयुष्य घालवत आहे.

२) मनीषा कोईराला : मनीषाने २०१० मध्ये नेपाळच्या व्यावसायिक सम्राट दहल बरोबर लग्न केले. लग्नानंतर त्यांच्यामध्ये सारखे वादविवाद होऊ लागले आणि लग्नाच्या २ वर्षांनंतरच त्यांनी एकमेंकांपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर मनीषाला कॅन्सरहि झाला. त्या आता कॅन्सर पासून पूर्ण सुटल्या आहेत आणि आनंदाचं जीवन जगत आहेत. ३) प्रीती झंगियानी : बॉलीवूडमध्ये ‘मोहब्बते’ हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. त्यामधूनच या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. तिने २००८ मध्ये उद्योगपती परवीन डबास बरोबर लग्न केले. परंतु मुलाच्या जन्माला येण्यानंतर ते दोघेही वेगळे झाले. सध्या ते घटस्फोट न घेता वेगळे वेगळे राहत आहेत. ४) संगीता बिजलानी : १९८०-१९९० च्या संगीता हि सलमान खानच्या बरोबर रिलेशन मध्ये होती. दोघांचे हे नाते लग्नापर्यंत आले होते. परंतु संगीताने सलमान खानला नाकारून क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन बरोबर लग्न केले. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर ती आई नाही बनू शकली. त्यानंतर तिने २०१० मध्ये घटस्फोट घेतला आणि आता ती एकटी राहत आहे. ५) महिमा चौधरी : बॉलीवूड किंग शाहरुख खानबरोबर सुपरहिट चित्रपट ‘परदेस’ मध्ये एक भोळीभाबडी मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. ती लग्नाच्या आधीच आई होणार होती. या गोष्ट समजताच तिने तिचा बॉयफ्रेंड बॉबी मुखर्जी बरोबर २००६ मध्ये लग्न केले. पण लग्नाच्या ७ वर्षानंतरच तिने आणि बॉबीने घटस्फोट घेतला. त्यानंतर अजूनही महिमा तिच्या मुलाबरोबर एकटी आयुष्य जगत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *