वादळामुळे बोट बुडाली, पाच दिवस समुद्रात पोहत होता हा माणूस नंतर

समुद्र एक खूप विशाल सागर आहे. जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत. समुद्रात प्रवास करणे हे स्वतःच्या जबाबदारीचेच काम असते. जेव्हा तुम्ही बस, रिक्षा अश्या वाहनांनी प्रवास करता तेव्हा दुर्घटना जरी घडली तरी आसपासचे लोक मदतीला येऊन तुम्हाला वाचवू शकतात. मात्र जर तुम्ही समुद्रात किंवा पाण्यातून प्रवास करत असाल आणि तुमची बोट पलटी झाली तर लगेच मदत मिळू शकणार नाही आणि जर पोहता येत नसेल तर लगेच प्राण देखील जाऊ शकतात. समुद्रात बोटीने जास्त करून मच्छिमार, कोळी लोक जातात.

आपलं घर चालवण्यासाठी कोळी लोक बोटीत बसून मासे पकडायला जातात. मात्र जेव्हा वादळ येत तेव्हा समुद्र रुद्र रूप धारण करतो आणि मोठ्या लाटांपुढे अनेक बोट पलटी होतात. अशीच एक घटना पश्चिम बंगाल मधील परगणा जिल्ह्यात असणाऱ्या नारायणपूर चे रहिवासी रवींद्रनाथ दास आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या १४ साथीदारांसोबत घडली. ४ जुलै २०१९ ला हे बांधव मासे पकडायला समुद्रात निघाले होते. ६ जुलै ला एक मोठं वादळ आलं. वादळामुळे नाव पलटी झाली त्यानंतर काहींनी समुद्रात उड्या मारल्या तर काही बोटीखाली चिरडून मृत पावले.जस जस वेळ पुढे जात गेलं तस तस एकेकाचा मृत्यू पाण्यात होत गेला. रवींद्र म्हणतात, “बोटीमध्ये माझा भाचा पण होता त्याचा जीव पण मी वाचायच्या काही तासांपूर्वीच झाला. त्यामुळे मला भाच्याला वाचवू न शकल्याचे दुःख देखील आहे.” रवींद्र याना १० जुलै रोजी चितगाव जवळ बांगलादेश च्या एका जहाज मधील क्रू ने वाचवले. जेव्हा बोट उलटली तेव्हा एका लाकडी फळीच्या तुकड्याचा आधार घेऊन रवींद्र पोहत होते. त्या फळीच्या तुकड्याच्या आधारावरच ते पाच दिवस जिवंत पोहत राहिले. पाच दिवस ते उपाशीच होते आणि पावसाचे पाणीच ते पित होते. रवींद्र याना वाटत होते कि आता आपण मारणार मात्र ते जगण्याचा संघर्ष करत राहिले. पोहता पोहता ते बांग्लादेशच्या सीमेवर पोहचले. तेव्हा त्यांची नजर एका बांगलादेशी जहाजावर गेली पण ते खूप लांब होते. जहाज पाहिल्याने त्यांना स्फूर्ती आली आणि २ तास पोहून ते त्या जहाजाजवळ पोहचले आणि तेथील लोकांनी त्यांना वाचवले. त्यानंतर त्यांच्यावर कोलकाता मधील रुग्णालयात इलाज सुरु होता. त्यांच्या १५ जणांच्या तुकडीत ते एकटेच आपला जीव वाचवू शकले. त्यांची हि गोष्ट ऐकून खूप लोक चकित झाले मात्र प्रयत्न केला तर कोणतेही संकट मनुष्य पार करू शकते याच रवींद्र हे जिवंत उदाहरण आहे.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *