इमरान हाशमी चं विवाहित महिलेसोबत होत अफेअर, तिच्या नवऱ्याने पकडल्यानंतर त्याने

मित्रानो २००४ साली इमरान हाशमी चा मर्डर नावाचा सिनेमा आला होता. मल्लिका शेरावत सोबत त्याने खूप रोमान्स केला ज्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये यांचं नाव खूप गाजल. सगळीकडे इमरान हाशमीची चर्चा सुरु असायची. त्यानंतर इमरान ने अनेक सिनेमे यासारखेच केले होते ज्यामध्ये त्यांनी रोमँटिक सिन दिले. तेव्हापासून लोक इमरान हाशमी ला ‘सिरीयल किसर’ नावाने ओळखू लागले. मुली तर त्याच्यामागे वेड्या झाल्या होत्याच मात्र मुलं पण त्याला चॉकलेट बॉय म्हणून ओळखत होते. चित्रपटातच नाही तर इमरान खऱ्या आयुष्यात देखील या बाबतीत एक्टिव होता.

एका जुन्या इंटरव्यू मध्ये इमरान हाशमी ने स्वतः आपलं गुपित उघड केलं होत. “मर्डर” चित्रपटात एका विवाहित तरुणीसोबत इमरान रोमान्स करतो म्हणून त्याला प्रश्न विचारला गेला कि, तुम्ही कधी खऱ्या आयुष्यात लग्न झालेल्या महिलेसोबत अफेअर केलं आहे का? तेव्हा इमरान म्हणाला, “होय ! माझं एका लग्न झालेल्या महिलेसोबत अफेअर होत. मात्र मला तेव्हा माहित नव्हतं कि तीच लग्न झालेलं आहे. नंतर मला समजलं कि तीच लग्न झालेलं आहे पण तरीही माझं अफेअर मी सुरूच ठेवलं.”पुढे इमरान हाशमी म्हणाला, “मला माहित आहे मी तेव्हा थांबायला हवं होत. पण मला नाही माहित मी असं का नाही केलं. मी नेहमी तिला भेटत राहिलो कारण जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कशाची पर्वा नसते. मला माझ्या कृत्याची नेहमी जाणीव व्हायची आणि मी विचार करायचो कि, माझ्या बायकोने जर असं केलं असत तर मी तिच्या प्रियकराला जीवानिशी मारलं असत. मी या प्रश्नाने त्रस्त होतो पण तरीही मी अफेअर सुरूच ठेवलं.”यानंतर इमरान हाशमी ने ते सांगितलं जेव्हा तिच्या नवऱ्याने त्यांना एकत्र पकडलं. तो म्हणाला, “आमचं प्रकरण तिच्या नवऱ्याला कळल्यानंतर आमच्यात मारामारी सुरु होणार होती मात्र एक मित्र मध्ये आला आणि त्याने भांडण थांबवलं. तेव्हापासून मी कोणत्याही महिलेसोबत एक रात्र काढण्यातच विश्वास ठेवतो त्याहून जास्त रिलेशन ठेवत नाही.” तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, इमरान हाशमी चे हे अफेअर त्याच्या लग्नापूर्वी होते. सध्या ‘परवीन साहनी’ सोबत तो सुखाने राहतो व त्याना ‘आयान’ नावाचा मुलगा देखील आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *