कामाख्या मंदिरात होणाऱ्या यात्रेत देशभरातून येतात तांत्रिक, पहा काय आहे यामागचं कारण

कामाख्या मातेचं मंदिर आसाम राज्यात स्थित आहे. या मंदिरात दर वर्षी यात्रा भरते आणि यात्रेत लाखो लोकांची गर्दी असते. या यात्रेला ‘अंबुवाची मेला’ या नावाने ओळखले जाते. यावर्षी २२ ते २६ जून पर्यंत हि यात्रा भरली होती. या मंदिरात असणारी यात्रा खूप भव्य असते, ती पाहण्यासाठी भारतभरातून लोक येतात आणि तांत्रिक देखील येतात. आसाम मधील गुवाहाटी येथे असलेल्या मंदिरात तांत्रिक का येतात तसेच मंदिराची माहिती आपण थोडक्यात आपल्या एनएमजे या संकेतस्थळावर पाहणार आहोत.

कामाख्या देवीचे हे मंदिर ५२ शक्तिपीठांमधून एक आहे आणि हे मंदिर देवी सती साठी समर्पित आहे. अंबुवाची यात्रेमध्ये या मंदिरात पूजा केली जात नाही. तेथील स्थानिक लोकांच्या मते यात्रा सुरु होते तेव्हा चार दिवस मंदिराच्या गर्भ गृहात पूजा अर्चना होत नाही. यावर्षी २२ ते २४ जून या दिवशी मंदिर बंद होते आणि २५ जून ला सकाळी मंदिर खुले केले गेले. यानंतर कामाख्या देवीची पूजा केली गेली. हे मंदिर तंत्र विज्ञानाशी संबंधित आहे. तंत्र विज्ञानाशी संबंध असल्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातून तांत्रिक या मंदिरात येतात.तांत्रिक अंबुवाची यात्रेच्या वेळी येथे येऊन तंत्र विद्या मध्ये सिद्धी प्राप्त करतात यासाठी ते इथे येतात. जो भक्त या मंदिरात येतो त्याला प्रसाद म्हणून ओल कापड दिल जात आणि त्या कपड्याला अंबुवाची वस्त्र म्हणून लोक ओळखतात. या मंदिराला जेव्हा बंद करतात तेव्हा मूर्तीजवळ सफेद कापड अंथरतात. जेव्हा पाचव्या दिवशी मंदिर उघडतात तेव्हा ते कापड लाल रंगाने भिजलेले मिळते. या मंदिराच्या दर्शनानंतर भक्त उमानंद भैरव मंदिरात नक्की जातात. असं मानलं जात कि, उमानंद भैरव मंदिराच्या दर्शनानंतर कामाख्या देवीची यात्रा पूर्ण होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *