या माणसाने ४० वर्ष्यांपासून आपले केस कापले नाहीत आणि धुतले नाहीत, कारण पाहून थक्क व्हाल

आपले केस प्रत्येक व्यक्तीला प्रिय असतात. जास्तकरून मुलींना असं वाटत कि आपले केस नेहमी दाट, मजबूत आणि लांब असावेत. मुलींना लांब केस खूप सुंदर दिसतात. मुलांचं पाहायला गेलं तर त्यांचे केस लहानच असतात मात्र साधू संत हे लोक केस आणि दाढी वाढवलेले दिसतात. आज आम्ही तुम्हाला अश्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याचे केस सहा फूट लांब आहेत आणि तो कोणी साधू संत नाही. चकित करणारी बाब हि आहे कि या माणसाने सांगितले मागच्या चाळीस वर्ष्यांपासून केस कापले नाहीत आणि धुतले देखील नाहीत.

बिहार मधील मुगेर जिल्ह्यातील रहिवाशी साकल देव यांच्या केसाची लांबी ६ फूट आहे. साकल देव यांना गावकरी मंडळी महात्मा म्हणून हाक मारतात. हे कोणी साधू संत नाहीत तर वनविभागाचे रिटायर कर्मचारी आहेत. ३१ वर्षे वन विभागात त्यांनी काम केले आणि आता ते घरीच काही औषधे बनवतात. यांनी बनवलेली औषधे यांच्या केसाप्रमाणेच फेमस आहेत. त्यांची औषधे विकत घेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. साकल देव यांचं कुटुंब देखील खूप मोठं आहे. त्यांनी केस का नाही कापले याविषयी आपण पाहूया.बाहेर निघताना साकल देव केसांना सफेद कापड लावतात. ४० वर्ष्यांपासून केस धुतले नाहीत मग त्यातून येणार घाण वास आणि केसातील घाण याच त्यांना काही वाटत असेल हे त्यांनाच माहित. साकल देव म्हणाले कि, “एकदा माझ्या स्वप्नात देव आले होते. देव मला म्हणाले स्वतःचे केस कधीच कापू नकोस. दारू, सिगरेट पिन सोडून दे. तेव्हापासून मी देव आज्ञेचं पालन करत आहे आणि केस कापत नाही.” मित्रानो श्रद्धा अंधश्रद्धा आपला वयक्तिक विषय आहे मात्र अश्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणे तुम्हाला टिपत योग्य वाटते हे कमेंट करून आम्हाला नक्की काळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *