मुंबईतील या मंडळाच्या इकोफ्रेंडली मूर्तीची किंमत पाहून तुम्ही हैराण व्हाल

मित्रानो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लोक आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करीत आहेत. अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करतात. घरातही डेकोरेशन करण्यासाठी विविध कल्पना सुचवून आकर्षक सजावट लोक करत असतात. मागच्या वर्षी सरकारने प्लास्टिक बंदी केली आणि थर्माकोल चे डेकोरेशन खूप जास्त प्रमाणात कमी झाले. निसर्गाला हानी पोहचू नये आणि प्रदूषण टाळण्यासाठी अनेक मंडळे इकोफ्रेंडली सजावट करण्याचा प्रयत्न करतात. आपण देखील भविष्याचा विचार करून इकोफ्रेंडली सजावट केली तर नक्कीच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व लोकांना तुमचा चांगला आदर्श देखील मिळेल.

प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्यांमुळे खूप जलप्रदूषण होते म्हणून मातीच्या मूर्ती तसेच इकोफ्रेंडली मुर्त्यां बनवल्या जातात. यंदाच्या वर्षी मुंबईतील लालबाग मधील तेजुकाया मंडळाने इकोफ्रेंडली मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांची यंदाची मूर्ती २१ फुटांपेक्षा उंच आहे आणि महत्वाचे म्हणजे हि मूर्ती इकोफ्रेंडली आहे. कागदाच्या लगद्यापासून हि मूर्ती बनवली जात आहे. इकोफ्रेंडली मूर्ती आली म्हणजे खर्च देखील जास्त येणार. तेजुकाया मंडळाला दार वर्षी ४ लाख रुपये मूर्तीसाठी खर्च येतो मात्र यावर्षी त्यांचा खर्च मूर्तीसाठी तीन पटीने वाढला आहे.तेजुकाया मंडळाची यावर्षीची मूर्ती १२ लाखांची आहे आणि ती इकोफ्रेंडली आहे. या मूर्तीसाठी पेपरची जमवाजमव त्यांनी मागील वर्षीपासूनच सुरु केली होती. मागील १४ वर्षयांपूर्वी देखील या मंडळाने अशी मूर्ती तयारी केली होती. तेजुकाया मंडळ यावर्षी जास्त डेकोरेशन करणार नसून तो पैसे पूरग्रस्तांना देणार आहे तसेच देवाला हार फुल न आणता वही, पेन, पेन्सिल सारखे साहित्य घेऊन या असे मंडळाने भक्तांना आवेदन केले आहे. त्यांनी दिलेले साहित्य पूरग्रस्तांना मदतीसाठी पाठवले जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक गणपती मंडळांनी डेकोरेशन वर कमी खर्च करून पूरग्रस्तांना मदत करायचे ठरवले आहे. आपला महाराष्ट्र नेहमी सर्वांच्या मदतीला गेला आहे मात्र महाराष्ट्राच्या मदतीला काहीच हात पुढे आले. पण महाराष्ट्रातील जनतेने जे पूरग्रस्तांना मदत करून माणुसकी दाखवली आहे ते खरंच अंगावर काटा आणणारी आहे. देवापेक्षा, श्रद्धेपेक्षा माणुसकी धर्म दाखून लोक एकत्र आले हाच खरा धर्म आहे. एखाद्यावर वेळ येते तेव्हाच अडचणीचे महत्व त्याला कळते. तुम्ही देखील सजावट कमी करून तसेच इकोफ्रेंडली गणपती बसवून प्रदूषण कमी करण्यास मदत करू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *