NMJOKE

का पितात मुलं सिगारेट, रिसर्च मध्ये मिळाली हि कारणे नक्की पहा

हे तर सर्वांना माहीतच आहे कि, स्मोकिंग (धूम्रपान करणे) आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. धूम्रपान किती हानिकारक आहे असे सतत बातमीपत्र, टीव्ही किव्हा फ्लेक्स वर दिसणाऱ्या जाहिरातीमध्ये सांगितली जाते. एवढच नाही तर सिगरेट च्या पाकिटावर सुद्धा छापलेले असते कि “सिगरेट ओढणे हानिकारक आहे” सिगरेट चे जास्त सेवन केल्यास कर्करोग होतो. तरीही लोकं सिगरेट ओढत असतात खास करून आज ची युवा पिढी सिगरेट ची नशा खूप मोठ्या प्रमाणात करत आहे. काही लोकं तर एका दिवसात सिगरेटने भरलेले पूर्ण पॅकेट संपवतात. अश्यातच एक प्रश्न आपल्या मनात उद्भवतो कि मुलं एवढे सिगरेट नेमकं पितात तरी का? ह्याच सर्व प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एक रिसर्च केली गेली आहे.

फोर्टिस हॉस्पिटल मधील मनोचिकित्सा विभागामधील डॉक्टर समीर पारीख चे असे म्हनणे आहे कि ह्या रिसर्च द्वारे, आम्ही युवापिढी मधील सिगरेट ओढण्याची सवय आणि त्यामागील तत्यांची प्रमुख कारणे व उद्देश जाणून घेणायचा प्रयत्न करीत आहोत. ह्या रिसर्चसाठी देशामधील एकूण ६ राज्यातील १९०० विद्यार्थ्यांवर हा प्रयोग केला गेला होता. ह्या सर्वे मध्ये विद्यार्थ्यांकडून सिगरेट पिण्याचे कारण, उद्देश आणि त्यांच्या विचारांविषयी त्यांना विचारण्यात आले होते. रिसर्च द्वारे प्राप्त झालेल्या आकड्यांमुळे ह्याचे धक्कादायक कारण समोर आले.सर्वे चे परिणाम –
१) ५० टक्क्यांहून अधिक लोक ह्यासाठी सिगरेट ओढतात कारण हे करून ते आपल्या मित्रांसमोर मनोरंजन करू शकतील आणि कुल दिसू शकतील. २) ७५ टक्के विद्यार्थ्यांचं असं म्हनणं आहे कि, जेव्हा मित्र त्यांना सिगरेट ऑफर करतात तेव्हा त्यांना नकार देणे बरोबर वाटत नाही. ३) ८८ टक्के लोकांचं म्हनणं आहे कि, ते जेव्हा त्यांच्या वडिलांना सिगरेट पिताना बघतात तर ती सवय त्यांना स्वतःला पण बरोबर वाटते. ४) ६२ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचं म्हनणं आहे कि ते जेव्हा चित्रपटात एखाद्या अभिनेत्याला सिगरेट ओढतांना पाहतात तर त्यामुळे त्यांना देखील त्यांच्या मार्फत तीच प्रेरणा मिळते. ५) ८५ टक्के लोकं म्हणतात कि त्यांनी सिगरेट चं सेवन करणे सुरु केले आहे कारण, ह्याचा आयुष्यामध्ये एकदा तरी अनुभव केला पाहिजेत. ६) ७८ टक्के विद्यार्थी सांगतात कि, आमचे मित्र हे सिगरेट पिणारे आहेत आणि म्हणून त्यांना बघून आम्हाला हि सिगरेट पिण्याची सवय लागली आहे. ७) ८५ टक्के विद्यार्थी म्हणतात कि सिगरेट ची सवय सोडण्यासाठी जर एखाद्या मोठ्या अभिनेता किव्हा धूम्रपान-विरोधी विभागाने जर अभियान सुरु केले तर हि सवय सोडण्यास मदत होऊ शकते. ८) ३० टक्के लोक तर असं म्हणतात कि सिगरेट चे सेवन केल्याने त्यांच्या अंगामधील थकवा कमी होण्यास मदत होते. ९) ५२ टक्के लोकं सांगतात कि सिगरेट पिल्याने त्यांचे कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यात मदत होते. १०) फक्त १ टक्के लोकांचं असं मत आहे कि ह्या सिगरेटच्या सवयी पासून वाचण्यासाठी फक्त आपली परिषद च जवाबदार आहे. जर तुम्ही सिगरेट चे सेवन करत असाल तर ते का करता हे आम्हाला कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. जर शक्य होत असेल तर, तुम्ही हि सिगरेटचे सेवन करण्यास टाळा.
Exit mobile version