NMJOKE

आता आता : या मोठ्या नेत्याचे झाले निधन

मित्रानो या वर्ष्याचा ऑगस्ट महिना खूप दुःखाचा वाटत आहे. याच महिन्यात काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज सारख्या महान नेत्यांचं निधन झालं. त्यापाठोपाठ आणखीन एक वाईट बातमी मिळाली आहे. सांगताना दुःख होत आहे मात्र भारताचे पूर्व वित्तमंत्री अरुण जेटली यांचं २४ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झालं. अरुण जेटली हे भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा खास चेहरा होते. अरुण जेटली यांनी वित्त मंत्रिपद आणि सुरक्षा दोन्ही मंत्रालयाचा कारभार सांभाळला.

अरुण जेटली याना ९ ऑगस्ट रोजी दिल्लीमधील एम्स या रुग्णालयात दाखल केलं गेलं होत. एम्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर त्यांचा इलाज करत होते. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी त्यांचं डायलिसिस केलं गेलं होत. शुक्रवारी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी बीजेपी च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती एम्स रुग्णालयात गेल्या होत्या. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपति रामनाथ कोविंद सहित अनेक मोठे नेते त्यांना पाहायला गेले होते. श्वास घेण्यास अडथळा तसेच अस्वस्थता होत असल्याने अरुण जेटली याना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची तब्बेत अनेकता बिघडत होती. त्यांच्या आजारपणामुळेच त्यांनी २०१९ मध्ये निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. २४ ऑगस्ट २०१९ रोजी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी एम्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. अरुण जेटली हे एक महान नेते होते देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
Exit mobile version