“तारक मेहता का उलटा चष्मा” मधल्या पात्रांचे खरे कुटुंब पहा

“तारक मेहता का उलटा चष्मा” आजच्या दिवसांत टीव्हीवर प्रदर्शित होणारा सर्वात प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला लोकांची खूप पसंदी सुद्धा भेटत आहे. असा कदाचितच कोणी व्यक्ती नसेल कि ज्याने हा कार्यक्रम पहिला नसेल. ह्या कार्यक्रमाची एक खास गोष्ट आहे कि, ह्या कार्यक्रमामध्ये एक गोकुळधाम सोसायटी आहे जी फक्त एक सोसायटी नसून संपूर्ण परिवार आहे, ज्यामध्ये सर्व लोकं एक परिवाराप्रमाणे राहत आहेत. सोसायटीमध्ये कोणालाही कुठल्या प्रकारची अडचण असली कि, ती समस्या सोसायटीमधील सर्व लोकं मिळून दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि कदाचित अश्याच काही कारणांमुळे हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध आहे. हा शो एवढा गमतीशीर आहे कि तुम्ही किती वेळा जरी पाहिलात तरी हि तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि ह्या कार्यक्रमामधील प्रत्येक जण आपली भूमिका खूप चांगल्या रीतीने करतो आणि म्हणूनच आपण कार्यक्रम पाहत असताना आपल्या हसू आवरू शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि हा कार्यक्रम निला टेलिफिल्म ने बनवला आहे आणि ह्याचे मालक असित कुमार मोदी हे आहेत. हा कार्यक्रम टीव्ही वर २८ जुलै २००८ पासून सुरु झाले आहे आणि आजही ह्या कार्यक्रमाचे प्रसारण दररोज सब टीव्हीवर रात्री ८ वाजता केले जाते. तर आता पर्यंत आम्ही तुम्हाला ह्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती सांगत होतो. तुम्ही ह्यामधील सर्व पात्रांना पहिलेच असेल पण आज आम्ही तुम्हाला ह्या पात्रांच्या आणि त्यांच्या परिवाराविषयी सांगणार आहोत.

१) जेठालाल / दिलीप जोशी : तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये जेठालाल ची भूमिका साकारणाऱ्या पात्राचे खरे नाव हे दिलीप जोशी आहे. यांचा जन्म २६ मे १९६८ ला पोरबंदर येथील गोसा गावात झाला होता. ह्यांच्या खऱ्या बायकोचे नाव जयमाला आहे आणि ह्या दोघांना दोन मुले सुद्धा आहेत. दिलीप यांना लहानपनापासूनच टीव्ही वर येण्याची इच्छा होती आणि त्यांना नाटकं करायची फार आवडत होती. शाळेत असताना ते नेहमी नाटक स्पर्धेत भाग घेत होते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.२) तारक मेहता / शैलेश लोढा : कार्यक्रमामधील जेठालालचे सर्वात जवळचे मित्र तारक मेहता आहेत. तारक मेहता हे नेहमी जेठालालला त्यांच्या अडचणीत साथ देत असतात. तारक मेहता चे खरे नाव शैलेश लोढा आहे. तारक हे शो मध्ये एका लेखकाची भूमिका करत आहेत पण यांच्या विषयी तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहित नसेल ती म्हणजे, ते वास्तविक जीवनात सुद्धा एक अप्रतिम लेखक आहेत. शैलेश चे लग्न झाले आहे आणि त्यांच्या बायकोचे नाव स्वाती लोढा आहे आणि या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे जिचं नाव स्वरा आहे.३) दया गडा / दिशा वकानी : दया हि शो मध्ये तिच्या हसण्याच्या पद्धतीहून खुप प्रसिद्ध आहे, तिची हसण्याची पद्धत हि फारच वेगळी आहे जी बघून आपल्याला सुद्धा खूप हसू येईल. दया शो मधील जेठालाल च्या बायकोची भूमिका करत आहे. जेठालाल-दया हे दोघे हि शो मधील प्रमुख पात्र आहेत, यासोबत या दोघांना १ मुलगा दाखवला आहे आणि जेठालाल चे आजोबा सुद्धा दाखवले आहेत. दया चे खरे नाव दिशा आहे. दिशा चा जन्म १७ सप्टेंबर १९७८ साली अहमदाबाद येथे झाला होता. त्यांच शालेय शिक्षण सुद्धा तिच्या राहत्या गावी म्हणजेच अहमदाबाद ला पूर्ण झाले. शो मधील सुंदरलाल हे तिचे वास्तविक जीवनातील खरे भाऊ आहेत. दिशा हि आपल्या वडिलाना बघून फिल्म लाईन मध्ये आली आहे.४) चंपकलाल / अमित भट्ट : ह्या शो मधील एकमेव आजोबा म्हणजेच चंपकलाल हे आहेत. चंपकलाल जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. त्यांच खर नाव अमित भट्ट आहे. वयाच्या १६ वव्या वर्षापासूनच ते थिएटर मध्ये काम करत आहेत आणि त्यांना अभिनय करण्यात आधीपासूनच रस होता म्हणून त्यांनी अभिनयामध्ये करियर करायचे ठरवले. त्यांनी आपल्या जीवनात बरेच किरदार निभावले आहेत. ते मुंबई मध्ये आपल्या बायको सोबत राहतात आणि त्यांना २ जुळे मुलं सुद्धा आहेत.५) पत्रकार पोपटलाल / श्याम पाठक : पत्रकार पोपटलाल जे आपल्या एका आवाजाने दुनिया हलवून टाकण्याची टाकत ठेवतात आणि ते शो मधील गोकुळधाम ह्या सोसायटी मधील असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांचे लग्न अजून सुद्धा नाही झाले. त्यांनि आता पर्यंत १५० हुन जास्त अधिक मुलींना पसंद केले असेल पण त्यांना अजून कोणी च [पसंद नाही केले आणि जिने पसंद केले तिची कुंडली जुळत नव्हती म्हणून ते अजून देखील अविवाहित आहेत. ते शो मध्ये एका वर्तनमान पात्रासाठी बातम्या छापण्याचे काम करतात. पोपटलाल चे खरे नाव श्याम पाठक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, वास्तविक जीवनात त्यांचे लग्न देखील झाले आहे आणि त्यांना तीन मुलं आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *