घरात आई भाऊ नसताना १५ वर्षाच्या मुलीने केला वडिलांचा

मित्रानो जेव्हा आपण लहान होतो तेव्हा प्रेम वगैरे हे काहीच माहिती नव्हते. आता लहान मुलांचे देखील प्रेम संबंध असतात आणि ते प्रेमात वेडे होऊन जातात. एखादी व्यक्ती प्रेमात पडल्यावर सर्वकाही विसरून त्याचा किंवा तिचाच विचार करते. लहान वयात किंवा कोवळ्या वयात होणाऱ्या प्रेमात मुलं हद्द पार करून बसतात. प्रेम नसून आकर्षण असत हे त्यांना काळात नाही. असे अनेक प्रकार तुम्ही आजवर पहिले असतील मात्र आता एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे.

१५ वर्ष्याच्या मुलीने १९ वर्षीय प्रियकरासोबत प्लॅन रचून आपल्याच वडिलांचा जीव घेतला आहे. जयकुमार याच्या कुटुंबात एक मुलगा एक मुलगी पत्नी आणि ते स्वतः रहात होते. पत्नी आणि मुलगा पुडुचेरी येथे एका समारंभाला गेले होते त्यामुळे घरात वडील जयकुमार आणि त्यांची १५ वर्ष्यांची मुलगी हे दोघेच होते. मुलीने याचा फायदा घेऊन वडिलांच्या दुधात औषध टाकले व त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर आपल्या प्रियकराला तिने घरी बोलावले. दोघांनी मिळून जयकुमार यांच्यावर रात्री चाकूने हल्ला केला. शनिवारच्या रात्री हि संपूर्ण घटना घडली. रात्री त्यांनी खून केल्यानंतर सकाळ होण्याची वाट पहिली. सकाळ झाल्यावर मुलीने पेट्रोलपंम्पवर जाऊन पेट्रोल आणले व वडिलांच्या मृतदेहास बाथरूम मध्ये नेले. बाथरूम मध्ये त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळले पण आजचा धूर बाहेर जाऊ लागला त्यामुळे शेजरच्यानी अग्निशमन दलाला बोलावले. हे सर्व करत असताना दोघांचे पाय देखील भाजले गेले होते. अग्निशमन दल येताच घटनेचा पंचनामा सुरु झाला पोलीस आले आणि त्यांनी कबुल करून घेतले.१९ वर्षीय प्रियकराला तुरुंगात टाकले असून १५ वर्षीय मुलीला बालसुधार गृहात टाकले गेले. प्रियकर प्रवीण आणि मुलगी ५ वर्ष्यांपासून एकमेकांना ओळखतात. दोघेही एकाच शाळेत होते, प्रवीण ३ वर्षे मोठा होता. दोघेही फोनवर बोलत असत याची कल्पना घरच्यांना आल्यामुळे मुलीचा मोबाईल काढून घेतला. प्रवीणची शाळा संपल्यानंतर त्याने महाविद्यालयात प्रवेशास घेतला यामुळे त्यांचं भेटणं कमी झालं मोबाईल काढून घेतल्याने बोलणं देखील कमी झालं. तरीही प्रियकर प्रवीणने तिला मोबाईल घेऊन दिला आणि ते नंतर रस्त्यावर, मॉलमध्ये भेटू लागले. वडिलांनी मुलीला त्याच्याशी बोलू नको असे सांगितले होते आणि तिला मारले देखील होते तसेच मोबाईल देखील काढून घेतला यामुळे संधी साधून मुलीने वडिलांची हत्या केले असल्याचे कळून येत आहे. तुम्ही देखील आपल्या मुलांवर वेळीच लक्ष द्या नाहीतर वेळ निघून जाईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *